शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला, पण आता..."; शरद पवारांचे मोठं विधान
2
अभिमानास्पद! गडचिरोलीचा बोधी रामटेके संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘ग्रॅज्युएट स्टडी प्राेग्राम’मध्ये!
3
दुर्दैवी! सुरतची लक्झरी बस सापुतारा घाटात कोसळली; दोन जण मृत्यूमुखी, पाच गंभीर जखमी
4
सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना अतिवृष्टीमुळे सोमवारी सुट्टी; शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा
5
वाहतूक कोंडीमुळे मंत्री, आमदारांचे ‘वंदे भारत’; नाशिक- मुंबई रोडची दुरवस्था
6
लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेतले; इंटरनेट कॅफेच्या चालक, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
7
छत्तीसगडच्या बालसुधारगृहातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुली नागपुरमध्ये ताब्यात
8
कुंडई औद्योगिक वसाहतीत संरक्षक भिंत कोसळल्याने तीन कामगार ठार, एक किरकोळ जखमी
9
'लाडकी बहीण' समितीत तालुका सचिव पदासाठी तहसीलदारांचे हात वर; कामाचा व्याप जास्त
10
मिहान परिसरात कनेक्टिव्हिटी वाढवणे, वाहतूक सुविधा सुधारण्याकरिता १५ जुलैपासून ई-बस सेवा
11
राज्याच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष केंद्रित; विदर्भ, मराठवाड्यात उद्योगांच्या समस्या सोडविणार!
12
RFOच्या डोक्यावर नावालाच राजपत्रित मुकुट; ना पदोन्नती, ना संख्या वाढ!
13
कट, कमिशन व करप्शन ही काँग्रेसची त्रिसूत्री; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
पुरीमध्ये भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू, अनेक भाविक जखमी
15
"आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव विधिमंडळात घ्या अन् लोकसभेत पाठवा, आम्ही पाठिंबा देतो"
16
ZIM vs IND : भारताच्या 'युवा ब्रिगेड'ने पराभवाचा वचपा काढला; झिम्बाब्वेचा मोठ्या फरकाने पराभव केला
17
"माझे नाव इतिहासात नक्कीच लक्षात ठेवले जाईल"; निरोपाच्या भाषणात ऋषी सुनक यांचे विधान
18
भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसला मतदान केले, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट
19
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकरी बांधवांसोबत साधला संवाद
20
कोणती अभिनेत्री नाही पण लवकरच लग्नाची बातमी येईल; 'चॅम्पियन' खेळाडू नव्या इनिंगसाठी सज्ज

...तर भोलेबाबांचीही चौकशी,  २ महिलांसह ६ सेवेकरी अटकेत; 'त्या'साठी १ लाखाचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 6:50 AM

फरार आरोपी देवप्रकाश मधुकर याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

मैनपुरी : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगाच्या कार्यक्रमस्थळी सेवेकरी म्हणून काम करणाऱ्या दोन महिलांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक व सध्या फरार असलेला मुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्याला पकडून देणाऱ्यास पोलिसांनी १ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. आवश्यकता वाटल्यास भोलेबाबाचीही पोलिस चौकशी करणार आहेत.

राम लडाईत (वय ५० वर्षे), उपेंद्र यादव (६२), मेघ सिंग (६१), मुकेश कुमार (३८) तसेच महिलांपैकी मंजू यादव (३०) आणि मंजू देवी (४०) अशी अटक केलेल्या सहा आरोपींची नावे आहेत. हाथरस येथे २ जुलै रोजी सत्संगाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला होता. सत्संगाला ८० हजार लोकांनी उपस्थित राहण्याची परवानगी प्रशासनाने दिली होती; पण प्रत्यक्षात अडीच लाख लोक हजर राहिले, असे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. 

भोलेबाबाचा मुख्य सेवेकरी झाला फरारमुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर हाथरसच्या सिकंदराराऊ येथील रहिवासी असून तो भोलेबाबा यांचा निकटवर्तीय आहे. त्याचे घर सध्या बंद असून तो परिवारासहित फरार झाला असल्याचे सांगण्यात आले. मैनपुरी येथील भोलेबाबांच्या आश्रमामध्ये पोलिसांनी बुधवारी रात्री प्रवेश केला होता. 

दुर्घटनेमागे मोठा कट असण्याची शक्यताउत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  या दुर्घटनेमागे मोठा कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हटले होते. चौकशी समिती आपला अहवाल दोन महिन्यांत सरकारला सादर करणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

सर्व मृतदेहांची ओळख पटलीहाथरस येथील चेंगराचेंगरीमध्ये जीव गमावलेल्या सर्व १२१ लोकांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे, असे तेथील जिल्हाधिकारी आशिषकुमार यांनी गुरुवारी सांगितले. हे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

राहुल गांधी आज हाथरसला भेट देणारलोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील हाथरस येथे शुक्रवारी दौरा करणार आहेत. ही माहिती काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी तिरुवअनंतपुरम येथे गुरुवारी दिली. हाथरस येथील सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन १२१ जणांचा बळी गेला होता. ही अतिशय दुर्दैवी घटना होती, असेही ते म्हणाले. हाथरसमधील दुर्घटनेत जखमी झालेले लोक, मृतांचे नातेवाईक यांच्याशी राहुल गांधी संवाद साधतील. 

टॅग्स :Policeपोलिस