बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी त्यांनी पोलिस खात्याचे ‘भगवेकरण’ होऊ देणार नाही, असे सांगत भाजप राजवटीत घडलेल्या काही घटनांबद्दल अधिकाऱ्यांना खडसावले.
उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले, “तुम्ही पोलिस खात्याचे भगवेकरण करणार आहात का? आमच्या सरकारमध्ये याला परवानगी नाही. मंगळूर, विजापूर, बागलकोट येथे भगवे कपडे घालून तुम्ही विभागाचा कसा अपमान केला हे मला माहीत आहे. जर तुम्हाला देशाबद्दल आदर असेल तर तुम्ही राष्ट्रध्वज घेऊन काम केले पाहिजे.’ शिवकुमार यांनी स्पष्ट केले की, लोकांना या सरकारकडून मोठ्या बदलांची अपेक्षा आहे. त्याची सुरुवात पोलिस खात्यापासूनच व्हायला हवी. या सरकारकडून परिवर्तनाचा संदेश लोकांपर्यंत जायला हवा. तुमची पूर्वीची वागणूक आमच्या सरकारमध्ये चालणार नाही.
तेव्हा आमच्याशी कसे वागलात...डीके शिवकुमार यांनी भाजपच्या राजवटीत काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांवर, सिद्धरामय्या आणि त्यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही पोलिसांवर केला. ते म्हणाले, “आम्ही जेव्हा ‘पे सीएम’ मोहीम केली तेव्हा तुम्ही माझ्याशी आणि सिद्धरामय्याशी कसे वागला हे मला माहीत आहे, मात्र, विरोधी पक्षावर गुन्हा दाखल झाला नाही. पोलिस अधिकाऱ्यांना आपला दृष्टिकोन बदलावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
‘केंद्र अध्यादेश आणून अधिकार गोठवील’केंद्र सरकार भविष्यात कर्नाटक आणि इतर राज्यांमधील सेवांवर नियंत्रण ठेवण्याचा अध्यादेशदेखील आणू शकते, असा इशारा ‘आप’चे ज्येष्ठ नेते सौरभ भारद्वाज यांनी बुधवारी दिला. अजय माकन कर्नाटकातील विजयाचा आनंद व्यक्त करत आहेत; पण त्यांनी लक्षात ठेवावे की, केंद्र उद्या कर्नाटकात असाच अध्यादेश आणेल.