शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

पंतप्रधान प्राणप्रतिष्ठापना करतील, मग मी तिथे टाळ्या वाजवू का? पुरीच्या शंकराचार्यांनी घेतले अयोध्येला न जाण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 12:39 PM

Ram Mandir: पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्य यजमान म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रामलला मंदिरातील गर्भगृहात विराजमान होण्याची शक्यता आहे.

अयोध्येमध्ये उभ्या राहत असलेल्या राम मंदिरामध्ये २२ जानेवारी रोजी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्याला भव्य दिव्य बनवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार आणि अयोध्येतील प्रशासन जय्यत तयारी करत आहे. मंदिराचा तळमजला बांधून पूर्ण झाल आहे. तिथे सध्या सजावटीचं काम सुरू आहे.  दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्य यजमान म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रामलला मंदिरातील गर्भगृहात विराजमान होण्याची शक्यता आहे.

मात्र या गोष्टीला ओदिशामधील जगन्नाथपुरी मठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी विरोध केला आहे. रतलाम येथे संवाद साधताना त्यांनी सांगितले की, मी २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी जाणार नाही. तिथे मोदी लोकार्पण करतील. मूर्तीला स्पर्श करतील. मग मी तिथे उभा राहून टाळ्या वाजवून केवळ जयजयकार करू का? माझ्या पदाची एक मर्यादा आहे. राम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ही शास्रांनुसार झाली पाहिजे. अशा सोहळ्याला मी का जाऊ. 

दरम्यान, राम मंदिर जन्मभूमी ट्रस्टकडून मिळालेल्या निमंत्रणाबाबत शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी सांगितले की, मला जे निमंत्रण मिळालं आहे. त्यावर तुम्ही आणि तुमच्यासोबत केवळ एक व्यक्ती  सोहळ्याला येऊ शकते, असं लिहिलेलं आहे. त्याव्यतिरिक्त आमच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क साधण्यात आलेला नाही. त्यामुळे मी या सोहळ्याला जाणार नाही. राम मंदिरावरून ज्या प्रकारचं राजकारण होत आहे, ते होता कामा नये होते.  सध्या राजकारणामध्ये काहीही चांगलं घडत नाही आहे, असं ते म्हणाले. तसेच धार्मिक स्थळांवर बांधण्यात येत असलेल्या कॉरिडोरवरही त्यांनी टीका केली.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या