लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारी सुरू झाली. या टप्प्यात १२ राज्यांतील ९४ मतदारसंघांचा समावेश असून, ७ मे रोजी मतदान आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल आहे. महाराष्ट्रातील मराठावाड्यातील काही मतदारसंघ आणि पश्चिम महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात निवडणुका होत असून ७ मे रोजी मतदान आहे.
मध्य प्रदेशातील बैतूल येथील निवडणूक स्थगित केली होती. बसपाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने येथील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार, बैतुलमध्ये २६ एप्रिलला मतदान होणार होते.
नकुलनाथ हे पहिल्या टप्प्यातील सर्वांत श्रीमंत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांमध्ये कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ हे सर्वांत श्रीमंत आहेत. त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ७१७ कोटी रुपयांची आहे. पहिल्या टप्प्यातील १० श्रीमंत उमेदवारांची एकूण संपत्ती २६६४ कोटीची आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने केलेल्या शपथपत्रांच्या विश्लेषणातून हे समोर आले आहे.