ज्या हनिमूनच्यावेळी नवऱ्याने त्याच्या नवरीसोबत असायला हवं होतं. त्याच हनिमूनवेळी नवरा नवरीऐवजी गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल करून तिच्यासोबत गुलुगुलू बोलत होता. ही बाब जेव्हा त्या नवरीने पाहिली तेव्हा मोठ्या वादाला तोंड फुटले. हॉटेलमध्येच या नवऱ्याने नवरीची धुलाई केली. वाद एवढा वाढला की, हॉटेलमधील स्टाफने मध्ये पडून सदर तरुणीला वाचवले. त्यामुळे हनिमून तर पूर्ण झाला नाही, उलट दोघेही दुसऱ्याच दिवशी घरी परत आले.
ही घटना आग्र्यामधील एका उच्चभ्रू कुटुंबात घडली आहे. एप्रिल २०२२ मध्ये येथील एका तरुणीचा विवाह पंचतारांकित हॉटेलमध्ये थाटामाटात झाला होता. १० दिवसांनंतर नवविवाहित दाम्पत्य हनिमूनसाठी सिमला इथे गेलं. दोघेही तिथे एका रिसॉर्टमध्ये थांबले. मधुचंद्राच्या रात्री जेव्हा नवऱ्याने त्याच्या नवरीसोबत असणं आवश्यक होतं. मात्र तो त्यावेळी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत व्हिडीओ कॉल करून गप्पा मारत बसला होता. नवरीने हे पाहिलं, तेव्हा तिनं याला विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने तिला मारहाण केली. दरम्यान, हॉटेलमधील स्टाफने मध्ये पडून त्या नवरीला वाचवलं.
दरम्यान, आता वधूने आरोप केला की, विवाहानंतर मधुचंद्रासाठी जेव्हा ते सिमला येथे गेले. तेव्हा वराने कॅनडामध्ये घर घेण्यासाटी ५० लाख रुपयांची मागणी केली. मात्र त्याला नकार दिल्यावर तो संतप्त झाला. नणंदेने तर लग्नात घातलेले दागिने काढून आपल्याकडे ठेवले. मी हे सर्व सहन करत होते. नवरा हा व्यसनी आहे. तसेच त्याने गर्लफ्रेंडसमोरच माझा अपमान केला. तर सासऱ्यांनी मला मनोरुग्ण ठरवले. एवढंच नाही तर नणंद मला झोपेच्या गोळ्या खाऊ घालायची. कुटुंबीयांनी समजवल्यावरही सासरच्या मंडळींच्या वागण्यात काही फरक पडला नाही.
त्यानंतर डिसेंबरमध्ये नवरा मला सोडून कॅनडाला गेला. तसेच तो व्हॉट्सअॅपवर जेव्हा काही बोलायचा तेव्हा असभ्यपणे बोलायचा. जानेवारी महिन्यात तो परत आला. तेव्हा त्याने पुन्हा छळ करण्यास सुरुवात केली. तसेच दुसरे लग्न करण्याची धमकीही देऊ लागला. फेब्रुवारी महिन्यात मी माहेरी निघून आले, तेव्हा तो तिथेही आला. त्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या जाचातून सुटण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यावर तिने पोलिसांत तक्रार दिली.