Corona In India: देशात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. गेल्या २४ तासात देशात १,२४९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ७,९२७ इतकी झाली आहे. पॉझिटिव्हीटीचा दर वेगानं वाढत आहे असून तो ८ टक्क्यांच्यावर पोहोचला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते पाच टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हीटी दर चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत व्हायरस पसरण्याचा धोका वाढतो. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि गोव्यात पॉझिटीव्हीटी दर ८ टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्र (८.३२), हिमाचल प्रदेश (८.६६) आणि तर गोव्यात ९.५२ टक्के इतका आहे. याचा अर्थ या तीन राज्यांमध्ये प्रति १०० कोविड चाचण्यांमध्ये ८ पेक्षा जास्त लोकांना संसर्ग होत आहे, तर आठवडाभरापूर्वीपर्यंत या तीन राज्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी होते. पण आता व्हायरसचा प्रसार झपाट्याने वाढत आहे.
नव्या व्हेरिअंटमुळे रुग्णांमध्ये वाढया राज्यांमध्ये Omicron च्या XBB.1.16 सब-व्हेरियंटचे रुग्णाही वाढत आहेत. या व्हेरिअंटचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात १०५ आणि कर्नाटकात ५७ रुग्ण आढळले आहेत. या व्हेरिअंटचे रुग्ण वाढत आहेत. XBB.1.16 व्हेरियंटपासून कोणताही गंभीर धोका नाही, असं तज्ज्ञ म्हणत असले तरी त्याची लक्षणे सौम्य असतात. श्वसनाचा त्रास कोणत्याही रुग्णाला दिसत नाही. एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या माहितीनुसार कोविडचा विषाणू सतत बदलत आहे. यातून नवीन प्रकार येत आहेत, परंतु गेल्या एका वर्षात ओमिक्रॉनचे वेगवेगळे प्रकार येत आहेत, जे जास्त संसर्गजन्य नाहीत. अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही.
या गोष्टींची घ्या काळजीडॉ गुलेरिया म्हणाले की कोविड विषाणू अद्याप संपलेला नाही. यातून केसेस येत आहेत आणि त्याचा लोकांना संसर्ग होत आहे. अशावेळी काळजी घेणं आवश्यक आहे. लोकांना मास्क घालण्याचा आणि मास्कशिवाय घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वृद्ध आणि इतर कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी याची विशेष काळजी घ्यावी.