हैदराबाद : घराणेशाही चालविणारे पक्ष नेहमी स्वत:च्यात फायद्याचा विचार करतात आणि असे पक्ष देशाचे सर्वांत मोठे शत्रू आहेत, अशी कडाडून टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. बेगमपेट विमानतळावर भाजप कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
राजकीय पक्षांच्या घराणेशाहीवर निशाणा साधत तेे म्हणाले की, ही भारतीय राजकारणाची समस्या तर आहेच, तसेच हे पक्ष देशाची लोकशाही आणि युवकांचे सर्वांत मोठे शत्रू आहेत. घराणेशाहीने युवकांची राजकीय संधी हिरावून घेतली आहे. राज्यातील सत्तारूढ तेलंगणा राष्ट्र समितीचा (टीआरएस) उल्लेख करताना मोदी यांनी आरोप केला की, हे पक्ष कसे आपलेच भले करीत आहेत, हे तेलंगणाची जनता बघत आहे. या लोकांना गरिबांची अजिबात पर्वा नाही. देशाने पाहिले की, भ्रष्टाचार कसा एक परिवार समर्पित राजकीय पक्षांचा चेहरा बनला आहे. मोदींनी यावेळी अंधश्रद्धेवरही परखड टीका केली. ते म्हणाले की, तेलंगणाच्या भूमीतून मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करतो. त्यांना काही लोकांनी सांगितले होते की, अमुक ठिकाणी जाऊ नका; परंतु योगी म्हणाले की, माझी विज्ञानावर श्रद्धा आहे. अशा ठिकाणी जाऊनही ते दुसऱ्यांचा मुख्यमंत्री झाले. अंधश्रद्धाळू लोकांना विकास नको आहे. जेथे घराणेशाही चालविणारे पक्ष नाहीत, तेथे विकासाचा मार्ग खुला झाला आहे.
इंडिया मीन्स बिझनेस - माेदीभारत आज विकासाचे एक माेठे केंद्र म्हणून समाेर आला आहे. गेल्या वर्षभरात भारतात विक्रमी परकीय गुंतवणूक आली आहे. भारताला व्यापाराशी देणे-घेणे आहे, असा संदेश जगात गेल्याचे पंतप्रधान माेदी म्हणाले. इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेसने आयाेजित केलेल्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते.
हिंदी थाेपवू नका - स्टॅलिनतेलंगणातून पंतप्रधान माेदी चेन्नईत दाखल झाले. तेथे त्यांनी ३१ हजार काेटींच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी पंतप्रधानांना हिंदी भाषा आमच्यावर थाेपवू नका, अशी विनंती केली.