तामिळनाडूच्या सलेम जिल्ह्यात दोन खासगी बसच्या समोर-समोर झालेल्या धडकेत 30 जण जखमी झाले आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार हा अपघात मंगळवारी 17 मेरोजी सायंकाळी झाला. एदाप्पद्दी (Edappadi) येथून 30 प्रवाशांना घेऊन जाणारी एक खासगीबस, 55 विद्यार्थ्यांना घेऊन थिरुचेंगोड येथून निघालेल्या दुसऱ्या खासगी बसला धडकली. हा अपघात एदाप्पदी-शंकरी हायवेवर असलेल्या कोझीपनई बस स्थानकाजवळ झाला. (Tamil Nadu bus Accident Video)
अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल -यासंदर्भात एएनआयने एक सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) शेअर केले आहे. यात बसच्या अपघातानंकर बसचालक कशा पद्धतीने दुसऱ्या सीटवर फेकला गेला, हे स्पष्टपणे दिसत आहे. या अपघातात बसचा एका बाजूचा भाग पूर्ण पणे डॅमेज झाला आहे.
व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल -तामिळनाडूतील हा व्हिडिओ (Tamilnadu Video) सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच, ड्रायव्हर रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने गाडी चालवताना दिसत आहे. समोरून आलेली गाडीही त्याच्या लक्षात आली नाही. या अपघातानंतर, ड्रायव्हरची प्रकृती खालावली, मात्र, तो शुद्धीवर होता. तसेच त्याच्या मागे बसलेली महिलाही खाली पडली होती. अगदी काही सेकंदांचा हा व्हिडिओ पाहून आपल्याही कालजाचा ठोका चुकेल...