मे महिन्यात कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा बंपर बहुमत मिळाले होते. त्यानंतर पक्षाने ज्येष्ठ नेते सिद्धारमैय्या यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली होती. मात्र हे सरकार स्थापन झाल्यापासूनच प्रचंड बहुमत असूनही ते कोसळेल, असा दावा केला जात आहे. आता भाजपाच्या एका बड्या नेत्याने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सिद्धारमैय्या सरकार कोसळेल, असा दावा केला आहे. काँग्रेसचे २५ आमदार पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत, असा दावा भाजपा नेते बसनगौडा पाटील यांनी केला आहे.
विजापूर मतदारसंघातील आमदार असलेल्या बसनगौडा पाटील यांनी सांगितले की, राज्यात भाजपा पुन्हा एकदा सत्तेत येईल. काँग्रेस म्हणते की त्यांनी १३५ जागा जिंकल्या आहेत. मात्र ते झोपू शकत नाही आहेत. जर ३० जणांनी पक्ष सोडला तर सरकार कोसळेल. २५ आमदार काँग्रेस सोडण्यास तयार आहेत. काही मंत्री त्यांच्याकडे सर्व शक्ती केंद्रित झाल्यासारखे वागत आहेत. तसेच ते अधिकाऱ्यांना हटवत आहेत किंवा त्यांच्या बदल्या करत आहेत.
विजापूरमध्ये मुस्लिम अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आल्याचा आरोप करत बसनगौडा पाटील म्हणाले की, तुम्ही मुस्लिमांना आणून काय करू शकता? मी आमदार आहे आणि त्यांनी माझं ऐकलं पाहिजे. जर कुणी अधिकारी हिंदूंवर अत्याचार करण्यासाठी नाटक करत असेल, तर आम्ही जानेवारीत परत सत्तेत येऊ. काँग्रेस लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारमधून बाहेर जाईल, असा दावाही त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, त्यामुळेच विजापूरमधील दोन मंत्री जे सत्ता आल्यानंतर हवेत उंच उड्डाणे घेतोय, असे वागत होते. त्यांचा आवाज आता काहीसा सौम्य झाला आहे. ३५ ते ४० आमदार पक्ष सोडण्यात तयार आहेत. हे त्यांना कळून चुकलंय. जर ३०-३५ जण तयर झाले तर हे सरकार पडेल.
बसवराज रायरेड्डी यांच्यासारख्या काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांकडून हल्लीच आमदारांच्या बैठकीमध्ये कर्नाटक हे भ्रष्ट राज्य बनल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्याकडे अंगुलीनिर्देश करत त्यांनी सांगितले की, त्यांचे स्वत:चे आमदार सांगत आहेत की, त्यांना पैसा हवाय, कारण त्यांनी निवडणुकीमध्ये खर्च केला आहे.