शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जम्मू-काश्मीरची परिस्थिती बदलतेय; सैनिकांवरील दगडफेकीच्या घटनांमध्ये 99% घट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 5:30 PM

सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण 60 टक्क्यांनी कमी झाले.

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर राज्यातील परिस्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये यापूर्वी जवानांवर होणारे हल्ले, दगडफेक आणि घुसखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे, दगडफेकीच्या घटना जवळजवळ पूर्णपणे संपल्या आहेत. यावरुन जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाल्याचे स्पष्ट होते. 

सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण 60 टक्के कमी मीडिया रिपोर्टनुसार, सुरक्षा दलांमधील घातपात, म्हणजेच सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण 60 टक्क्यांनी कमी झाले आहे. या वर्षी जी-20 बैठकही श्रीनगरमध्ये झाली. केंद्रीय गृह मंत्रालय जम्मू आणि काश्मीरवर लक्ष ठेवून आहे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नियमित अंतराने बैठका सुरू असतात. 

दगडफेकीच्या घटनांमध्ये मोठी घटआकडेवारीनुसार, 2020 च्या पहिल्या सहा महिन्यांत, स्थानिक अधिकाऱ्यांनी दगडफेकीच्या एकूण 324 घटनांची नोंद केली. पुढच्या वर्षी अशा घटना 179 पर्यंत खाली आल्या. 2022 आणि 2023 मध्ये याच कालावधीत एकूण 50 आणि 3 घटनांची नोंद झाली आहे. 2020 पासून जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या सुरक्षा जवानांच्या संख्येत मोठी घट दिसून आली आहे, हा आकडा 32 वरून 11 वर आला आहे.

स्फोटकांच्या जप्तीमध्ये मोठी घटजम्मू-काश्मीरमधून स्फोटके आणि ग्रेनेड्सच्या जप्तीतही घट झाली आहे. 2021 मध्ये सुरक्षा दलांनी सुमारे 68 किलो स्फोटके जप्त केली. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ही संख्या शून्य आहे. 2020 मधील 266 वरून 2023 मध्ये ग्रेनेड जप्तीचे प्रमाण 83 पर्यंत कमी झाले आहे. शस्त्रास्त्रांचा साठाही 246 वरून 73 वर आला आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद