शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

एकाच मंचावरून विरोधी पक्षांतील दिग्गजांची गर्जना; नितीश कुमारांनी सांगितला भाजपला हरवायचा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 7:18 PM

यावेळी भाजपवर निशाणा साधताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, 'आज बिहारमध्ये 7 पक्ष एकत्रितपणे काम करत आहेत. 2024 च्या निवडणुकीत त्यांना (भाजपला) जिंकण्याची कुठलीही संधी नाही.’

हरियाणातील फतेहाबाद येथे रविवारी विरोधी पक्षांतील दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर आले होते. निमित्त होते माजी उपपंतप्रधान देवी लाल यांच्या 109 व्या जयंती सोहळ्याचे. यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, जेडी(यू) नेते तथा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आरजेडी नेते तथा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, शिरोमणी अकाली दलाचे एसएस बादल आणि सीपीआय(एम)चे सीताराम येचुरी उपस्थित होते. INLD चे अध्यक्ष ओपी चौटाला यांच्या निमंत्रणावरून हे सर्व नेते येथे एकत्रित आले होते.

यावेळी भाजपवर निशाणा साधताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, 'आज बिहारमध्ये 7 पक्ष एकत्रितपणे काम करत आहेत. 2024 च्या निवडणुकीत त्यांना (भाजपला) जिंकण्याची कुठलीही संधी नाही.’

‘तिसऱ्या मोर्चाचा प्रश्नच नाही’ -नितीशकुमार म्हणाले, 'मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही. तसेच, तिसर्‍या आघाडीचा प्रश्नच येत नाही. काँग्रेससह एकच आघाडी असेल, तर आपण 2024 मध्ये आपचा पराभव करू शकतो. एवढेच नाही, तर मी काँग्रेससह सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करेन आणि तरच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा (भाजप) पराभव होईल, असेही नितीश यावेळी म्हणाले. ‘आता एनडीए नहीच’ -बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी यावेळी एनडीएवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘आता एनडीए राहिलेले नाही; शिवसेना, अकाली दल आणि जेडी (यू) सारखे भाजपचे  सहकारी लोकशाही वाचविण्यासाठी एनडीएतून बाहेर पडले आहेत.’

‘सर्वांनाच काम करण्याची वेळ आली आहे’ -यावेळी एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, ‘2024 मध्ये सरकार बदलण्याच्या दृष्टीने सर्वांनाच काम करण्याची संधी आली आहे.’ शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत ते म्हणाले,  ‘शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन केले. मात्र, सरकारने त्याकडे बराचवेळ लक्ष दिले नाही. सरकारने शेतकरी नेत्यांवरील गुन्हे परत घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते पूर्ण केले नाही.' 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारHaryanaहरयाणाBJPभाजपाSharad Pawarशरद पवार