लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : राज्यातील ४ पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवापदक’, तर ४४ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक’ (एमएसएम) जाहीर झाले आहेत. यातील ३९ पोलिस पदके ‘गुणवत्तापूर्ण सेवे’साठी तर पाच पदके कारागृहात सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवांच्या श्रेणीत गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (एमएसएम) जाहीर झाली आहेत.
यावर्षी एकूण ९४२ ‘पोलिस पदके’ जाहीर झाली असून देशभरातील एकूण १०१ पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवापदक' (पीएसएम), ९५ पोलिसांना ‘पोलिस शौर्य पदक’(पीएमजी) आणि ७४६ पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (एमएसएम) पोलिस पदके जाहीर करण्यात आली आहेत. यावर्षी राज्यातून चंद्रकिशोर मीना आणि आरती सिंह या अधिकारी दाम्पत्याला एकाचवेळी पुरस्कार जाहीर झाले आहेत.
राष्ट्रपती विशिष्ट सेवेसाठी पदक (पीएसएम)देशातील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवापदक’ जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी -कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. त्यांची नावे अशी.१. डॉ. रवींद्र कुमार झिले सिंग सिंगल-अतिरिक्त महासंचालक२. दत्तात्रय राजाराम कराळे- पोलिस महानिरीक्षक३. सुनील बळिरामजी फुलारी-पोलिस महानिरीक्षक४. रामचंद्र बाबू केंडे - पोलिस कमांडंट
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके (एमएसएम)१. संजय भास्कर दराडे, महानिरीक्षक२. वीरेंद्र मिश्रा, महानिरीक्षक३. आरती प्रकाश सिंह, महानिरीक्षक४. चंद्र किशोर रामजीलाल मीना, महानिरीक्षक५. दीपक कृष्णाजी साकोरे, उपमहानिरीक्षक६. राजेश रामचंद्र बनसोडे, पोलिस अधीक्षक७. सुनील जयसिंग तांबे, पोलिस उपअधीक्षक८. ममता लॉरेन्स डिसुझा, सहायक पोलिस आयुक्त९. धर्मपाल मोहन बनसोडे, सहायक पोलिस आयुक्त१०. मधुकर माणिकराव सावंत, निरीक्षक११. राजेंद्र कारभारी कोते, निरीक्षक१२. रोशन रघुनाथ यादव, पोलिस उपअधीक्षक१३. अनिल लक्ष्मण लाड, पोलिस उपअधीक्षक१४. अरुण केरभाऊ डुंबरे, सहायक पोलिस आयुक्त१५. नजीर नसीर शेख, उपनिरीक्षक१६. श्रीकांत चंद्रकांत तावडे, उपनिरीक्षक१७. महादेव गोविंद काळे, उपनिरीक्षक१८. तुकाराम शिवाजी निंबाळकर, उपनिरीक्षक१९. आनंदराव पुंजाराव मस्के, सहायक उपनिरीक्षक२०. रवींद्र बाबुराव वानखेडे, उपनिरीक्षक२१. सुरेश चिंतामण मनोरे, निरीक्षक२२. राजेंद्र देवमान वाघ, उपनिरीक्षक२३. संजय अंबादासराव जोशी, सहा. उपनिरीक्षक२४. दत्तू एकनाथ गायकवाड, सहायक उपनिरीक्षक२५. नंदकिशोर ओंकार बोरोले, सहायक उपनिरीक्षक२६. आनंद रामचंद्र जंगम, सहायक उपनिरीक्षक२७. सुनीता विजय पवार, सहायक उपनिरीक्षक२८. जितेंद्र विठ्ठल म्हात्रे, सहायक उपनिरीक्षक२९. प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे, सहायक उपनिरीक्षक३०. राजेंद्र शंकर काळे, सहायक उपनिरीक्षक३१. सलीम गनी शेख, सहायक उपनिरीक्षक३२. तुकाराम रावसाहेब आव्हाळे, सहायक उपनिरीक्षक३३. रामभाऊ संभाजी खंडागळे, हेड कॉन्स्टेबल३४. संजय भास्करराव चोबे, प्रमुख कॉन्स्टेबल३५. सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन, सहायक उपनिरीक्षक३६. विजय दामोदर जाधव, हेड कॉन्स्टेबल३७. रामराव वामनराव नागे, सहायक उपनिरीक्षक३८. दिलीप भोजुसिंग राठोड, हेड कॉन्स्टेबल३९. आयुबखान अकबर मुल्ला, हेड कॉन्स्टेबल
सुधारात्मक सेवा - गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम)
१. विवेक वसंत झेंडे, अतिरिक्त अधीक्षक२. अहमद शमशुद्दीन मणेर, हवालदार३. गणेश महादेव गायकवाड, हवालदार४. प्रल्हाद दत्तात्रय कुदळे, हवालदार५. तुळशीराम काशिनाथ गोरावे, हवालदार