महबूबाबाद : तेलंगणाला भारत राष्ट्र समितीच्या कचाट्यातून भाजप साेडविणार असून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा संकल्प भाजपने केला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी महबूबाबाद येथील प्रचारसभेत केले.
माेदी यांनी मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, तेलंगणातील गरीब आणि तरुणांसाेबत बीआरएसने विश्वासघात केला आहे. अशा लाेकांना साेडणार नाही. लाेकांनी केसीआर सरकारला उखडून फेकण्याचा संकल्प आधीच घेतल्याचे माेदी म्हणाले.
घराणेशाही असलेल्या पक्षांच्या शासनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था नष्ट हाेते. काॅंग्रेस सत्तेत असताना सतत बाॅम्बस्फाेट व्हायचे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केली. ते म्हणाले, काॅंग्रेस जिथेही सध्या सत्तेत आहे, तिथे पीएफआयसारख्या दहशतवादी संघटनांना प्राेत्साहन मिळते.मी अपसेट होईन,
टॉवरवर चढू नका...नरेंद्र मोदी यांनी निर्मल येथील जाहीर सभेत आपले भाषण थांबवून लोकांना टॉवरवरून खाली उतरण्याचे आवाहन केले आणि ते पडण्याची भीती व्यक्त केली. ‘मी अपसेट होईन, टॉवरवर चढू नका,’ असे ते म्हणाले.
ते दाेन्ही पक्ष तेलंगणाचे दाेषीतेलंगणाला उद्ध्वस्त हाेण्यास काॅंग्रेस आणि बीआरएस हे दाेन्ही पक्ष बराेबरीचे दाेषी आहेत. तेलंगणाचे लाेक एका आजारापासून मुक्त हाेण्यासाठी दुसऱ्या राेगाचा प्रसार हाेऊ देणार नाहीत. राज्याचा पुढील मुख्यमंत्री भाजपचा असेल, असा दावाही माेदींनी यावेळी केला.
‘बीआरएस’ला ‘व्हीआरएस’ देण्याची वेळ : अमित शाह- सत्ताधारी बीआरएसला व्हीआरएस देण्याची वेळ आली आहे. तसेच त्यांची गाडी (बीआरएसचे निवडणूक चिन्ह) गॅरेजमध्ये पाठविण्याची वेळ आली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. - २०२४मध्येही नरेंद्र माेदीच हेच पंतप्रधान हाेणार असल्याचा दावाही शाह यांनी केला. हुजुराबाद येथील प्रचारसभेत ते बाेलत हाेते. अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणावरुन शाह यांनी बीआरएस, काॅंग्रेस आणि एमआयएम या तिन्ही पक्षांवर टीकास्त्र साेडले. - हैदराबाद संस्थानाचे १७ सप्टेंबर १९४८ राेजी भारतीय संघराज्यात विलीनीकरण झाले हाेते. मात्र, ओवैसींच्या भीतीमुळे केसीआर हा दिवस ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा करत नाहीत, असा आराेपही शाह यांनी केला.
हैदराबादचे ‘भाग्यनगर’ करू : जी. किशन रेड्डी भाजपची सत्ता आल्यास हैदराबादचे नाव बदलून ‘भाग्यनगर’ करण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी यांनी स्पष्ट केले. एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मद्रासचे नाव चेन्नई, बाॅम्बेचे मुंबई आणि कलकत्ताचे नाव काेलकाता करण्यात आले, तर हैदराबादचे नाव बदलून ‘भाग्यनगर’ करण्यात काय अडचण आहे? हैदर काेण आहे, कुठून आला, काेणाला त्याची गरज आहे, असा सवाल करून रेड्डी म्हणाले, भाजप सत्तेत आल्यास हैदर नाव हटविण्यात येईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनीही त्यांच्या तेलंगणातील प्रचार सभांमध्ये हैदराबादचे नाव ‘भाग्यनगर’ आणि महबूबनगरचे नाव ‘पालामुरू’ करायला हवे, असे अनेकदा म्हटले आहे.