लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या पंजाबच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेसला धक्का दिल्यानंतर ममता बॅनर्जी ह्या २१ फेब्रुवारी रोजी पंजाबच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. तसेत पंजाब दौऱ्यामध्ये ममता बॅनर्जी ह्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे पंजाबचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन चर्चा करू शकतात. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला धक्का दिल्यानंतर ममता बॅनर्जी ह्या आपसोबत आघाडीबाबत विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी ह्या पंजाबच्या दौऱ्यामध्ये सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, ममता बॅनर्जी ह्या २१ फेब्रुवारी रोजी पंजाबच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. आपल्या या दौऱ्यादरम्यान, त्या केजरीवाल आणि भगवंत मान यांच्याशी चर्चा करण्याची दाट शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी आघाडीच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्या आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत होणाऱ्या बैठकीला महत्त्वपूर्ण मानले जात आहे. एकीकडे विविध मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकऱ्यांकडून आंदोलन होत असतानाच ममता बॅनर्जी पंजाबच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच आंदोलक शेतकऱ्यांवर झालेल्या बलप्रयोगाचा त्यांनी निषेध केला आहे.
किमान हमीभाव कायद्याची हमी, कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाचा अहवाल लागू करण्याच्या मागणीवरून पुन्हा एकदा शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. पंजाबमधील शेतकरी संघटनांनी विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे कूच करण्याची ठाम भूमिका घेतली आहे. तसेच अनेक शेतकरी हे दिल्लीकडे निघाले आहेत. सध्यातरी हे शेतकरी पंजाब हरियाणा बॉर्डरवर आहेत. तसेच या शेतकरी आंदोलकांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे.