शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

जमिनीची दुबार विक्री करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 8:20 AM

विक्री रद्द, खरेदीदार व विक्रेत्याला दहा लाख दंड, गरिबांचे शोषण चिंताजनक

- डॉ. खुशालचंद बाहेती  लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जमीन विक्रीचा करार  अमलात आला की, विक्रेत्याचा जमिनीवरील हक्क संपतो असे म्हणत दुबार विक्री करणाऱ्यास आणि खरेदीदाराला दहा लाखांचा दंड ठोठावत एकाच जमिनीची अनेकांना विक्री करणाऱ्यांना  सुप्रीम कोर्टाने दणका दिला.  या निर्णयामुळे शहरात एकच प्लॉट अनेकांना विक्री करणाऱ्या भूमाफीयांच्या कटाला बळी पडलेल्या पीडितांना दिलासा मिळेल.

२ डिसेंबर १९८५ रोजी कौशिक मिश्रा यांनी शेलवली (ता. पालघर, ठाणे) येथे १.५ हेक्टर जमीन खरेदी केली व ताबाही घेतला. ५ डिसेंबर १९८५ रोजी सब-रजिस्ट्रार, पालघर यांच्याकडे विक्री दस्त नोंदणीसाठी सादर केला.  तथापि, मुद्रांक शुल्कातील त्रुटीमुळे करार नोंदणीकृत झाला नाही आणि नोंदणीसाठी प्रलंबित राहिला.  परिणामी त्यांची नावे महसूल अभिलेखात न लागता पूर्वीचेच नाव पुढेही चालू राहिले.

८ जून २०११ रोजी कांजी रावरिया यांनी या जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला.  त्यानंतर कौशिक मिश्रा यांना कळले की, त्याच जमीन विक्रेत्याने ३ डिसेंबर २०१० रोजी कांजी रावरिया यांना  जमीन विकल्याच्या दस्तची नोंदणी झाली आहे. 

मिश्रा यांनी मुद्रांक शुल्कातील त्रुटी दूर केल्यानंतर २ डिसेंबर १९८५ रोजीचा  सादर केलेला विक्री दस्त १४ जून २०११ रोजी सब-रजिस्ट्रारकडे नोंदवण्यात आला. कौशिक मिश्रा यांनी कांजी रावरिया यांचा विक्री दस्त रद्द करण्यासाठी दावा दाखल केला. कोर्टाने म्हटले की, अशा प्रकरणांत न्यायालये केवळ लोकांचे जीवन आणि मालमत्ता हाताळत नाही, तर त्यांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न हाताळत असतात. दस्त नोंदणी झाला नाही म्हणजे विक्री झाली नाही असे नव्हे. नोंदणी न केल्याचा परिणाम इतकाच की, मालमत्ता हस्तांतरण कायदा आणि नोंदणी कायद्यामधील तरतुदींमुळे खरेदीदार पुरावा म्हणून दस्त सादर करू शकत नाही. दुसरा विक्री करार रद्द करत सुप्रीम कोर्टाने विक्रेता आणि खरेदीदाराला १० लाखांचा  दंड ठोठावला. 

सर्वोच्च न्यायालयाची निरीक्षणे...

nकेवळ करार नोंदणीकृत नसल्यामुळे विक्रेता कोणत्याही हक्काचा दावा करू शकत नाही. nनंतरच्या खरेदीदाराला आधीच्या विक्रीबद्दल माहिती नसली तरीही त्याला प्रामाणिक खरेदीदार मानले जाऊ शकत नाही.nआपल्या समाजाची रचनाच अशी आहे की, शक्तिवान कमकुवत लोकांचे शोषण करतात.nजमिनीची मालकी हा असा आखाडा आहे जिथे सतत सशक्त लोक  गरिबांची फसवणूक करण्यासाठी तलवारी पारजवताना दिसतात. nकायदेशीर प्रक्रियेत फेरफार करून दुहेरी फायदा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विक्रेत्यांमुळे सामान्य लोकांना  त्रास सहन करावा लागतो.nन्याय प्रक्रिया दशकानुदशके लांबते तेव्हा  फसवणुकीचे दु:ख अधिक तीव्र होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय