शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

Electoral bonds प्रकरण: उद्याच्या उद्या माहिती द्या, सर्वोच्च न्यायायलाने SBI ला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 11:58 AM

भारतीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी करणारा स्टेट बँक ऑफ इंडियाचा (SBI) अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

भारतीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक रोख्यांचे तपशील सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी करणारा स्टेट बँक ऑफ इंडियाचा (SBI) अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाने SBI ला १२ मार्च रोजी कामकाजाचे तास संपेपर्यंत निवडणूक रोख्यांचे तपशील उघड करण्यास सांगितले आहे. 

याआधी सुनावणीदरम्यान एसबीआयतर्फे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी माहिती देण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत मागितली होती. सुनावणीदरम्यान वकील साळवे म्हणाले की, न्यायालयाने एसबीआयला रोख्यांच्या खरेदीची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत, यामध्ये खरेदीदारांची माहिती तसेच रोख्यांच्या किंमतीचा समावेश आहे. याशिवाय राजकीय पक्षांचे तपशील आणि पक्षांना मिळालेल्या बाँडची संख्या देखील द्यावी लागेल, पण समस्या अशी आहे की माहिती काढण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया उलट करावी लागेल. SOP अंतर्गत, हे सुनिश्चित केले आहे की बाँड खरेदीदार आणि बाँडची माहिती यांच्यात कोणताही संबंध नाही. आम्हाला सांगण्यात आले की ते गुप्त ठेवावे लागेल. बाँड खरेदी करणाऱ्याचे नाव आणि खरेदीची तारीख कोड केलेली आहे, जी डीकोड होण्यास वेळ लागेल.

एसबीआयने देणगीदारांबद्दल स्पष्ट माहिती द्यावी

एसबीआयची याचिका वाचताना CJI म्हणाले,  अर्जात तुम्ही म्हटले आहे की, सर्व माहिती सीलबंद करून SBI च्या मुंबई मुख्य शाखेकडे पाठवली आहे. पेमेंट स्लिपही मुख्य शाखेत पाठवण्यात आल्या होत्या. म्हणजे दोन्ही तपशील मुंबईतच आहेत. पण, आम्ही माहितीची जुळवाजुळव करण्याच्या सूचना दिल्या नाहीत. एसबीआयने देणगीदारांबद्दल स्पष्ट माहिती द्यावी अशी आमची इच्छा आहे.

CJI यांनी SBI ला विचारले की, ते निर्णयाचे पालन का करत नाहीत. FAQ देखील दर्शविते की प्रत्येक खरेदीसाठी स्वतंत्र KYC आहे. न्यायमूर्ती खन्ना म्हणाले की, सर्व तपशील सीलबंद कव्हरमध्ये आहेत आणि तुम्ही फक्त सीलबंद कव्हर उघडा आणि तपशील द्या.

एसबीआयने काय सांगितले?

एसबीआयच्या वतीने वकील हरीश साळवे म्हणाले की, बाँड खरेदीच्या तारखेसोबतच बाँडचा क्रमांक आणि त्याचा तपशीलही द्यावा लागेल. यावर सरन्यायाधीशांनी विचारले की, १५ फेब्रुवारीला निर्णय कधी दिला आणि आज ११ मार्च आहे. निर्णयाची अंमलबजावणी अद्याप का झाली नाही? सर्वोच्च न्यायालयाच्या प्रश्नावर साळवे म्हणाले की, आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत. जेणेकरून चुकीची माहिती दिल्याबद्दल आमच्यावर खटला भरू नये. त्यावर न्यायमूर्ती खन्ना म्हणाले की, या खटल्याचा मुद्दा काय आहे. तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयSBIएसबीआय