शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

‘छुप्या’ कारभाराला सर्वोच्च न्यायालयाने लावला चाप, ऊठसूट ‘आरटीआय’चीही गरज नाही...

By अविनाश साबापुरे | Published: August 23, 2023 11:03 AM

सरकारी कार्यालयांचा ‘आरसा’ आता सर्वांनाच होणार खुला, न्यायालयाचे आदेश

अविनाश साबापुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: सर्वसामान्य नागरिकांसाठी आवश्यक असलेली प्रत्येक सरकारी कार्यालयातील कामकाजाशी संबंधित माहिती वेबसाइटवर टाकावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १७ ऑगस्टला दिले. त्यामुळे १७ वर्षांपासून सुरू असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या छुप्या कारभाराला चाप लागणार आहे, तर दुसरीकडे नागरिकांनाही अशी माहिती मिळविण्यासाठी ऊठसूट आरटीआय टाकावा लागणार नाही.

सर्व शासकीय प्राधिकरणांनी ‘केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम ४ (१) (ख)’मधील तरतुदीनुसार आपल्या कार्यालयाच्या १७ बाबींची माहिती वेबसाइटवर टाकणे बंधनकारक आहे. त्यातून नागरिकांना त्या प्राधिकरणाबाबत संपूर्ण माहिती मिळेल. या १७ बाबी म्हणजे त्या प्राधिकरणाचा आरसा असतो. ही माहिती वर्षातून दोन वेळा म्हणजेच १ जानेवारी आणि १ जुलैला अपडेट करायची असते. भारत सरकारच्या कार्मिक प्रशिक्षण विभागानेही (डीओपीटी) १५ एप्रिल २०१३ रोजी या तरतुदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत सर्व राज्य सरकार, केंद्रीय माहिती आयोग व राज्य माहिती आयोगाला मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. मात्र, कायदा पारित होऊन १७ वर्षे झाली तरी या तरतुदीकडे दुर्लक्ष होत आहे. 

या १७ बाबी कराव्या लागतील उघड

कार्यालयाची रचना, कार्य, कर्तव्ये, कार्यालयाचे अधिकार, कर्मचाऱ्यांचे अधिकार, कर्तव्ये, कार्यालयाच्या कामासाठी ठरवलेली मानके, कामासाठी वापरले जाणारे नियम, विनियम, सूचना, नियमपुस्तिका, अभिलेख, अधिकारी, कर्मचाऱ्याला मिळणारे मासिक वेतन तसेच नुकसानभरपाईची पद्धती यासह एकूण १७ बाबी उघड कराव्या लागणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे आता सर्व सार्वजनिक प्राधिकरणांना १७ बाबींची अद्ययावत माहिती वेबसाइटवर अपलोड करणे बंधनकारक आहे. त्याचे पालन न केल्यास थेट न्यायालयाच्या आदेशाचा अवमान समजला जाईल. त्यामुळे त्या प्राधिकरणाला कारवाईला सामोरे जावे लागेल.- विशाल ठाकरे, माहिती अधिकार, कार्यकर्ते तथा प्रशिक्षक

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताRight to Information actमाहिती अधिकार