शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

करार संपला तरी भाडेकरू फ्लॅट रिकामा करेना, वृद्ध मालक दाम्पत्य राहतेय पायऱ्यांवर; पोलीस म्हणतात कोर्टाचा आदेश हवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 1:03 PM

भाडेकरू असलेल्या महिलेने फ्लॅट रिकामा करण्यास नकार दिला आहे. मात्र, भाडेकरार संपून एक महिना उलटला आहे.

कायद्याने फ्लॅट मालक तसेच भाडेकरूंनाही काही अधिकार दिले आहेत. परंतू, त्याचा गैरवापर होताना दिसत आहे. असाच एक प्रकार ग्रेटर नोएडाच्या एका हाऊसिंग सोसाटीमध्ये घडला आहे. यामुळे मालक असूनही वृद्ध दाम्पत्याला घराबाहेरील पायऱ्यांवर रहावे लागत आहे. 

भाडेकरू असलेल्या महिलेने फ्लॅट रिकामा करण्यास नकार दिला आहे. मात्र, भाडेकरार संपून एक महिना उलटला आहे. तरी ती फ्लॅट खाली करणार नाही, असे दटावत आहे. पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेतली आहे. मुंबईत राहणाऱ्या सुनील कुमार आणि राखी गुप्ता या दाम्पत्याने निवृत्तीनंतरचे आयुष्य जगण्यासाठी  नोएडाच्या सेक्टर 16 मधील श्रीराधा स्काय गार्डन सोसायटीमध्ये घर घेतले होते. निवृत्तीला वेळ असल्याने त्यांनी ते घर भाड्याने दिले होते. १९ जुलैला हे दाम्पत्य तिथे पोहोचले. तेव्हापासून ते पायऱ्यांवर राहत आहेत. 

भारत पेट्रोलिअममध्ये कुमार हे काम करत होते. ते निवृत्त झाले आहेत. नोएडाला गेल्यावर ते दोन दिवस नातेवाईकांकडे राहिले. त्यांच्या फ्लॅटवर ३५ वर्षीय घटस्फोटीत महिलेने कब्जा केला आहे. कुमार यांच्या म्हणण्यानुसार या महिलेला त्यांनी गेल्या वर्षी ११ महिन्यांच्या करारावर फ्लॅट भाड्याने दिला होता. तेव्हाच तिला याची कल्पना दिली होती की ती ११ महिनेच राहू शकते, यानंतर आम्ही रहायला येणार आहोत. 

महिला भाडेकरू पतीपासून वेगळी राहते. तिच्यासोबत तिचा मुलगा असतो. घर खाली करण्यासाठी आठवण म्हणून तिला कुमार यांनी १९ एप्रिलला मेसेज देखील केला होता. तेव्हा तिला १० जूनला भाडेकरार संपत असून घर खाली करण्याचे कळविले होते. तेव्हा तीने हो असा मेसेज केला होता. मात्र, त्यानंतर तिने त्यांचा कॉल आणि मेसेजला रिप्लाय देणे बंद केले. काही दिवसांनी तिने तिच्या मुलाला बरे नव्हते असे कारण दिले. 

तिथे परिस्थिती पाहण्यासाठी नोएडामध्येच राहणारी कुमार यांची मेहुणी २२ जूनला गेली होती. तिचा अपमान करून तिला तिथून त्या महिलेने हाकलले. यानंतर कुमार स्वत: मुंबईहून नोएडाला आपल्या फ्लॅटवर गेले त्यांनाही त्या महिलेने नकार दिला. पोलिसांनीही कारवाई करण्यास नकार दिला. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे ते गेले. त्यांनी पोलीस आयुक्तांना तक्रार पाठवत अ्सल्याचे सांगितले. मात्र, अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. न्यायालयाच्या आदेशाशिवाय आम्ही कारवाई करू शकत नाही, असे डीसीपींनी सांगितले आहे. 

दुसरीकडे महिलेने फ्लॅट न सोडण्याचे कारण सांगितले आहे. सोसायटीचे लोक तिच्याबाबत काहीही बोलत असतात, अफवा पसरवत असतात. यामुळे त्या लोकांनी माफी मागावी आणि त्याचा व्हिडीओ बनवावा, तेव्हाच मी हा फ्लॅट सोडेन असे तिचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी