डेहराडून : उत्तराखंडमध्ये जवळपास बहुतांश जागांवर भारतीय जनता पार्टी आणि काॅंग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत. या राज्यात विद्यमान मुख्यमंत्री पराभूत झाले आहेत. ही परंपरा माेडण्याच्या इराद्याने मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. हरिद्वार, नैनिताल, खातिमा, श्रीनगर आणि चक्रता या ठिकाणी लक्षवेधक लढती हाेण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री धामी हे खातिमा मतदारसंघातून लढत आहेत. त्यांच्याविराेधात काॅंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष भूवनचंद्र कापरी यांचे पुन्हा एकदा आव्हान आहे. धामी यांनी २०१७ मध्ये कापरी यांना पराभूत केले हाेते.
हरिद्वारमध्ये चुरसभाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन काैशिक हे सलग चार वेळा हरिद्वार येथून विजयी झाले आहेत. त्यांच्यासमाेर काॅंग्रेसचे सतपाल ब्रह्मचारी यांचे आव्हान आहे. ब्रह्मचारी यांनी २०१२ मध्येही त्यांच्याविराेधात निवडणूक लढविली हाेती.
गंगोत्रीकडे लक्षहरीश रावत आणि हरक रावत हे यंदा कुठून निवडणूक लढविणार याबाबत अद्याप कुतूहल कायम आहे. गंगोत्री मतदारसंघात जिंकणारा पक्ष सरकार स्थापन करतो, अशी परंपरा राहिली आहे.