इंदूर : देशात ३० वर्षांत लोकसंख्येत मोठे बदल होणार असून त्यामुळे यादवी युद्धाचा धोका आहे, असे वादग्रस्त विधान मध्य प्रदेशचे मंत्री व भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी केले. विजयवर्गीय यांनी बेजबाबदार वक्तव्ये केले असून माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली.
नीट जगता येणार नाही अशी स्थिती येईल ते म्हणाले की, एका माजी लष्करी अधिकाऱ्याशी मी चर्चा केली. ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. आपल्याला नीट जगता येणार नाही अशी स्थिती निर्माण होऊ शकते, असे या माजी लष्करी अधिकाऱ्याने मला सांगितले. या गोष्टीचा लोकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. हिंदू समाजाला अधिक बळकट कसे करता येईल याचा विचार सर्वांनी करावा. तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. काही लोक जातीपातींच्या आधारे हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फोडा आणि झोडा ही ब्रिटिशांची नीती वापरून या लोकांनी सत्ता मिळविण्याचे मनसुबे रचले आहेत.