शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

गिझरचा स्फोट होऊन नवविवाहित डॉक्टर जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 10:34 AM

घटनेची माहिती मिळताच पाच मिनिटांत नाईट ड्युटी ऑफिसर एस श्रुती, पोलिस निरीक्षक के श्रीनिवास आणि अतिरिक्त पोलिस निरीक्षक मुजीब उर रहमानी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना घराच्या बाथरूममध्ये पती-पत्नी मृतावस्थेत आढळले

हैदराबाद - गुरुवारी रात्री उशिरा हैदराबादमधील लंगर हौज येथील खादरबागमधील एका घरात शॉर्टसर्किटमुळे गीझरचा स्फोट झाला. या भीषण अपघातात नवविवाहित जोडप्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे अपघात झाल्याचा अंदाज आहे. रात्री ९.३० वाजता पोलिसांना या प्रकरणाची माहिती स्थानिकांकडून मिळाली.

पती-पत्नी बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळलेघटनेची माहिती मिळताच पाच मिनिटांत नाईट ड्युटी ऑफिसर एस श्रुती, पोलिस निरीक्षक के श्रीनिवास आणि अतिरिक्त पोलिस निरीक्षक मुजीब उर रहमानी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना घराच्या बाथरूममध्ये पती-पत्नी मृतावस्थेत आढळले. २६ वर्षीय डॉक्टर निसारुद्दीन आणि २२ वर्षीय एमबीबीएस विद्यार्थी आणि निसरुद्दीनची पत्नी उम्मी मोहिमीन सायमा यांचा जागीच मृत्यू झाला होता. नाईट ड्युटी ऑफिसरने तात्काळ मृत व्यक्तींचे मृतदेह तपासणीच्या उद्देशाने शवागारात जतन करण्यासाठी उस्मानिया सामान्य रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली.

यापूर्वीही गिझरमुळे मृत्यू या वर्षीच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात नाशिकच्या जेलरोड परिसरात साक्षी जाधवचाही बाथरूममध्ये मृत्यू झाला होता, बाथरूममध्ये आंघोळ करताना गॅस गिझर चालवताना तिचा गुदमरून मृत्यू झाला होता. साक्षी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली होती. बराच वेळ होऊनही ती बाहेर न आल्याने घरच्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला असता ती बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यावेळी बाथरूममध्ये गॅसचा वास येत होता. तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांकडून साक्षीला मृत घोषित करण्यात आले. जाधव कुटुंबातील साक्षी ही एकुलती एक मुलगी होती.

गीझर धोकादायक का आहेत?सहसा घरातील लोकांच्या स्वयंपाकघरात आणि बाथरूममध्ये इलेक्ट्रिक गिझर असतात. पण अनेकदा लोक हिवाळ्यातही हे गिझर चालू ठेवतात. आता गिझर सतत चालू असल्याने त्यात गळतीची समस्या निर्माण झाली आहे. तसेच गीझर जास्त वेळ चालू ठेवल्याने त्याच्या बॉयलरवर खूप दबाव येतो. गरम पाण्याचा दाब बॉयलरमध्ये गळतो. अशा परिस्थितीत हा बॉयलर तांब्याचा नसेल तर त्याचा स्फोट होतो. बॉयलरचा स्फोट होऊन किती नुकसान होऊ शकते हे सांगता येत नाही, पण जर बॉयलर फुटला किंवा गळती झाली तर त्याचा करंट तुमचा जीव घेऊ शकतो हे मात्र नक्की. गिझरच्या पाण्याने आंघोळ करतानाही असे होऊ शकते. याशिवाय गॅस गिझरचीही मोठी समस्या आहे. गॅस गीझर कार्बन डायऑक्साइडऐवजी कार्बन मोनोऑक्साइड तयार करतात, ज्यामुळे चक्कर येणे, बेशुध्द किंवा गुदमरणे होऊ शकते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"