बुरखा घालून महाकाल मंदिरात आली महिला, म्हणाली, मला जिन्नने दर्शन घेण्याचे आदेश दिले, नेमकं काय प्रकरण, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 08:47 AM2022-02-18T08:47:38+5:302022-02-18T08:48:52+5:30

Mahakaleshwar Mandir: मध्य प्रदेशमधील उज्जैन जिल्ह्यामधील प्रसिद्ध महाकाल मंदिरामध्ये  गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. येथे एक महिला बुरखा घालून मंदिरात दर्शनासाठी आली.

The woman who came to the Mahakal temple wearing a burqa, said, Jinn ordered me to take darshan, find out exactly what happened | बुरखा घालून महाकाल मंदिरात आली महिला, म्हणाली, मला जिन्नने दर्शन घेण्याचे आदेश दिले, नेमकं काय प्रकरण, जाणून घ्या

बुरखा घालून महाकाल मंदिरात आली महिला, म्हणाली, मला जिन्नने दर्शन घेण्याचे आदेश दिले, नेमकं काय प्रकरण, जाणून घ्या

Next

उज्जैन - मध्य प्रदेशमधील उज्जैन जिल्ह्यामधील प्रसिद्ध महाकाल मंदिरामध्ये  गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. येथे एक महिला बुरखा घालून मंदिरात दर्शनासाठी आली. तिला पाहून सुरक्षारक्षक सतर्क झाले. त्यांनी या महिलेची चौकशी केली. तेव्हा तिने सांगितले की, ती एका जिन्नच्या आदेशाने मंदिरात आली आहे. त्यानंतर तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी या महिलेला महाकालेश्वराचं दर्शन घडवलं.

ही महिला महाकालेश्वर मंदिरात पोहोचली तेव्हा तिला बुरख्यामध्ये पाहून रांगेत उभे असलेले भक्त चकीत झाले. लोकांच्या सुरक्षेसाठी तिथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नजर तिच्यावर पडली. त्यांनी या महिलेला रोखले. त्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. प्रकरण मंदिराच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सदर महिलेला दर्शनाची परवानगी दिली. त्यानंतर पोलीस तिला दर्शनासाठी घेऊन गेले.

समोर आलेल्या माहितीनुसार बुरखा घालून महाकालेश्वर मंदिरामध्ये आलेली महिला मुस्लिम नव्हती. तिचं नाव लक्ष्मी असून, ती राजस्थानच्या भीलवाडा येथे राहणारी होती. तसेच तिच्यासोबत तिची आई आणि वडीलही दर्शनासाठी आले होते. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना दर्शन घडवले.

दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, लक्ष्मीची सखोल चौकशी करण्यात आली. तिने बुरखा परिधान करण्यासाठी जी कारणे दिली ती ऐकून सुरक्षा यंत्रणा थक्क झाल्या. त्या महिलेने सांगितले की, एका जिन्न च्या आदेशानुसार ती बुरखा घालून मंदिरात दर्शनासाठी आली आहे. मात्र या महिलेच्या आई-वडिलांनी तिचं मानसिक संतुलन चांगलं नसल्याचं सांगितलं आहे. सदर महिला अनेक दिवसांपासून बुरखा घालून महाकालाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त करत होती. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबीय तिला त्याच वेशात मंदिरात घेऊन गेले.  

Web Title: The woman who came to the Mahakal temple wearing a burqa, said, Jinn ordered me to take darshan, find out exactly what happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.