शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

आयएएस अधिकाऱ्याने सर्व मर्यादा ओलांडल्या; विद्यार्थीनीच्या मोफत सॅनिटरी पॅडच्या मागणीवर कंडोमचे उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 7:31 PM

सरकार २०-३० रुपयांचे सॅनिटरी पॅड महिलांना, मुलींनी मोफत देऊ शकत नाही का? असा सवाल एका विद्यार्थीनीने या आयएएस अधिकाऱ्याला केला होता.

पटना : बिहारमध्ये एक धक्कादायक तेवढाच घृणास्पद प्रकार समोर आला आहे. एका महिला आयएएस अधिकाऱ्याने सर्वांसमोर विद्यार्थीनीशी वाईट वर्तन केले आहे. या विद्यार्थीनीने महिलांच्या समस्यांवरील एका कार्यक्रमात सरकारने सॅनिटरी पॅड मोफत देण्याची मागणी केली होती. 

सरकार २०-३० रुपयांचे सॅनिटरी पॅड महिलांना, मुलींनी मोफत देऊ शकत नाही का? असा सवाल एका विद्यार्थीनीने या आयएएस अधिकाऱ्याला केला होता. यावेळी या महिला अधिकाऱ्याने सर्व मर्यादा तोडल्या व मग उद्या कंडोमपण मोफत द्यावे लागतील असे उत्तर दिले आहे. 

सॅनिटरी पॅडच काय, उद्या जीन्स पँटही देऊ शकतो, परवा चप्पलही का देऊ शकत नाही? एवढेच काय उद्या कुटुंब कल्याणवरून मागणी झाली तर कंडोमही मोफत देऊ शकतो, असे वक्तव्य आयएएस अधिकारी हरजोत कौर यांनी केले आहे. महिला आणि बाल विकास महामंडळ, युनिसेफ, सेव्ह द चिल्ड्रन आणि प्लॅन इंटरनॅशनल यांनी 'सशक्त बेटी, समृद्धी बिहार: गर्ल चाइल्डचे मूल्य वाढवण्याच्या दिशेने' या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत विद्यार्थीनीने हा प्रश्न मांडला होता, त्यावर कौर यांनी हे वादग्रस्त उत्तर दिले. 

यापुढे जाऊन कौर यांनी आणखी काही वक्तव्ये केली आहेत. कौर यांच्या या उत्तरावर जनतेच्या मताने सरकार बनते, असे विद्यार्थिनीने म्हटले असता, हा मूर्खपणाचा कळस असल्याचे म्हटले. असे जर तुम्हाला वाटत असेल तर मतदान करू नका, पाकिस्तानात जा, असे वक्तव्य केले. यावर विद्यार्थीनीने मी भारतीय नागरिक आहे मग पाकिस्तानात का जाऊ असे विचारले असता, तुम्ही पैसे आणि सेवा मिळविण्यासाठी मत देता का असा सवाल केला. कौर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

टॅग्स :Biharबिहारwomen and child developmentमहिला आणि बालविकास