काही महिन्यातच देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांनी तयारी सुरु केली आहे. तसेच देशातील ५ विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. या संदर्भात राहुल गांधींनी मोठा दावा केला आहे. एका कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले की, आम्ही तेलंगणा जिंकू शकतो, तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस नक्कीच जिंकत आहे. राजस्थानमध्येही अत्यंत निकराची लढत होणार आहे, असा दावा गांधींनी केला.
एनआयएकडून 'या' खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी जाहीर, सर्वांची मालमत्ता होणार जप्त
राहुल गांधी म्हणाले की, तेलंगणात भाजप कुठेही स्पर्धेत नाही. जर आपण छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्येही तसेच काहीसे आहे. राजस्थानमध्ये सध्या आमचे सरकार आहे आणि सरकारविरोधात कोणताही राग नसल्याचे येथील लोक सांगत आहेत.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही भारत जोडो यात्रेबाबत भाजपवर निशाणा साधला. गांधी म्हणाले, भाजप आणि मीडिया विरोधकांचा संदेश जनतेपर्यंत नीट पोहोचू देत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भारत जोडो यात्रेची मदत घेतली. त्यातही सरकारने अनेक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लोकांना थेट भेटणे चांगले, असंही राहुल गांधी म्हणाले.
"नारी शक्ती वंदन कायदा झाला असताना महिला आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे. ही आरक्षण पद्धत तातडीने लागू करण्याची काँग्रेसची मागणी आहे, मात्र केंद्र सरकार जनगणना आणि सीमांकनाची सबब पुढे करत व्यस्त आहे. यूपीए सत्तेत आल्यास आमचे सरकार महिला आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करेल, असंही राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदानी आणि मोदी सरकारमधील संबंधांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. गांधी म्हणाले की, सर्व मोठे उद्योग अदानी यांना देण्यात आले आहेत. देशातील जनता महागाईने हैराण झाली आहे, मात्र केंद्र सरकार याकडे लक्ष देत नाही. बिधूडी यांचे विधान असो किंवा इंडिया विरुद्ध भारत असा मुद्दा असो, हे सर्व मुद्दे मूळ मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठीच आहेत.