नवी दिल्ली - माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांच्या घरी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वी चिदंबरम यांच्या घरातून 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी चिदंबरम यांच्या निवसस्थानी काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवर संशय असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या पोलिस तपास सुरु आहे.
माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम यांच्या घरी चोरी झाल्याची घटना उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. चिदंबरम यांच्या घरात काम करणाऱ्यांपैकीच कोणीतरी ही चोरी केल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यामध्ये दोन महिला तोंडावर कापड बांधून घरात प्रवेश करताना दिसत आहेत. या दोन्ही महिला चिदंबरम यांच्या घरातील सफाई कामगार असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, याप्रकरणी चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी यांच्या मॅनेजरच्या तक्रारीवरुन पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. तर या चोरांच्या शोधमोहिमेसाठी डॉगस्क्वॉडलाही पाचारण करण्यात आले आहे.