दुचाकी चोरीचे रॅकेट सक्रीट असण्याची शक्यता ३४ दुचाकी हस्तगत : अटकेतील संशयिताकडून अन्य ५ साथीदारांच्या नावांची कबुली
By admin | Published: July 05, 2016 12:28 AM
जळगाव : दुचाकी चोरीप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी सर्फराज कलिंदर तडवी (वय ३५, मूळ रा.दौंड, जि.पुणे. ह.मु. कुसुंबा खुर्द, ता.रावेर) याने या गुन्ात त्याच्या सोबत असणार्या अन्य ५ साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली आहे. त्यामुळे जिल्ात दुचाकी चोरी करणारे मोठे रॅकेट सक्रीय असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून त्या दिशेने तपास सुरू आहे. दरम्यान, सोमवारी जिल्हा न्यायालयाने सर्फराजच्या पोलीस कोठडीत पुन्हा ३ दिवसांची वाढ केली.
जळगाव : दुचाकी चोरीप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी सर्फराज कलिंदर तडवी (वय ३५, मूळ रा.दौंड, जि.पुणे. ह.मु. कुसुंबा खुर्द, ता.रावेर) याने या गुन्ात त्याच्या सोबत असणार्या अन्य ५ साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली आहे. त्यामुळे जिल्ात दुचाकी चोरी करणारे मोठे रॅकेट सक्रीय असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून त्या दिशेने तपास सुरू आहे. दरम्यान, सोमवारी जिल्हा न्यायालयाने सर्फराजच्या पोलीस कोठडीत पुन्हा ३ दिवसांची वाढ केली.दुचाकी चोरीच्या गुन्ात जिल्हापेठ पोलिसांनी संशयित आरोपी सर्फराज तडवी याला २३ जून रोजी रात्री ११ वाजता अटक केली होती. अटकेनंतर तो पोलीस कोठडीत होता. सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पोलिसांनी मुख्य न्यायदंडाधिकारी के.एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले होते. सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना ॲड.आशा शर्मा यांनी सांगितले की, संशयित आरोपीने त्याच्या सोबत अजून ५ जण या गुन्ात असल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून आतापर्यंत ३४ दुचाकी हस्तगत झाल्या असून या प्रकरणात त्याच्याकडून आणखी दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता आहे. दुचाकी चोरीसाठी वापरत असलेली मास्टर चावी त्याने कोणाकडून बनवली आहे, त्याच्या सोबत अजून कोण-कोण आरोपी आहेत, या प्रकरणात मास्टर माइंड कोण आहे, या बाबींचा तपास करायचा असल्याने न्यायालयाने सर्फराजला ७ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी ॲड.शर्मा यांनी युक्तिवादात केली. ती मागणी ग्रा धरत न्यायाधीश कुलकर्णी यांनी त्याला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.आणखी दुचाकी हस्तगत होणारसर्फराज याने त्याच्या सोबत असलेल्या ५ जणांची नावे पोलिसांना सांगितली आहेत. त्यामुळे चोरीच्या आणखी दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पोलिसांनी सर्फराजकडून ३४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. हा आकडा अजून वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.५ साथीदार गुन्ात सहभागीदुचाकी चोरीच्या गुन्ात सर्फराज सोबत त्याचे अन्य ५ साथीदार सहभागी आहेत. पोलीस कोठडीत पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आहे. या चौकशीत त्याने संशयित आरोपी म्हणून युसूफ इब्राहीम तडवी (रा.कुसुंबा, ता.रावेर), शेख अक्रम शेख नजीर (रा.खिर्डी, ता.रावेर), शेख नइम शेख शब्बीर (रा.चिनावल, ता.रावेर), शेख एजाज शेख बाबू (रा.विवरा, ता.रावेर), उस्मान रमजान तडवी (रा.तिड्या, ता.रावेर) यांची नावे सांगितली असून त्यांचा तपास सुरू आहे.