शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सुपारी चोरीतील आरोपींचा पर्दाफाश

By admin | Published: February 11, 2015 11:19 PM

सुपारी चोरीतील आरोपींचा पर्दाफाश

सुपारी चोरीतील आरोपींचा पर्दाफाश
मुद्देमाल जप्त : लकडगंज पोलिसांची कामगिरी
नागपूर : हितेंद्र नटवरलाल मेहता यांच्या स्मॉल फॅक्टरी एरियातील गोडाऊनमधून सुपारीच्या पाच लाखाच्या २५ बॅग पळविणाऱ्या टोळीचा लकडगंज पोलिसांनी पर्दाफाश करून आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लकडगंज पोलिसांनी आरोपी राजकुमार ठाकूराम माणिकपंच (शाहू) (३१) रा. डिप्टी सिग्नल झोपडपट्टी बाजार चौक यास ताब्यात घेतले. त्याच्या माहितीवरून हितेश नानकराम आसवानी (२८) रा. दत्तनगर, एनआयटी गार्डनसमोर, हेमंत रेखराम शाहू (३९) रा. लालगंज गुजरी हनुमान मंदिराजवळ, सुंदरलाल रेखराम शाहू (३२) डिप्टी सिग्नल झोपडपट्टी बाजार चौक, धर्मेंद्र रामजी मेश्राम (२५) डिप्टी सिग्नल झोपडपट्टी बाजार चौक, अमीन रसीद शेख (३१) आदिवासी प्रकाशनगर झोपडपट्टी यांना अटक केली. चौकशीदरम्यान आरोपी धर्मेंद्र रामजी मेश्राम याने दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यात वापरलेला ट्रक क्रमांक एमएच ३१, सीबी-४५३५ चा चालक अजय ऊर्फ उगेश बुद्धू पटेल (२८) रा. श्रावणनगर, आटाचक्कीजवळ नंदनवन यास अटक करण्यात आली. गुन्ह्यात एकुण १० लाखाचा माल जप्त करण्यात आला. आरोपी हितेश आसवानी हा इतवारी अनाज बाजारात दलाल असून आरोपी धर्मेंद्र मेश्राम हा फिर्यादीच्या गोडाऊनमध्ये हमालीचे काम करीत होता. धर्मेंद्रने चोरीची टीप आरोपी सुंदरलाल शाहू यांना दिली. त्याने साथीदारांना सोबत घेऊन गोडाऊनमध्ये चोरी केली होती. ही कारवाई पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. के. जयस्वाल, पोलीस निरीक्षक एस. डी. मडावी, सहायक पोलीस निरीक्षक एस डी. निकम, हवालदार अजय रोडे, राजेंद्र बघेल, प्रवीण गाणार, रत्नाकर मेश्राम, मनोज नेवारे, सतीश पांडे, दीपक कारोकर, राजेश डेकाटे, सुबोध खानोरकर यांनी पार पाडली.

गरम मसाल्याची चोरीही उघड
आरोपी हितेश आसवानी याने लकडगंजमधील गरम मसाल्याच्या दुकानातील चोरीची माहिती दिली. हरिराम कमलेश कुमार यांच्या गरम मसाल्याच्या दुकानात १४ जानेवारीच्या मध्यरात्री चोरी झाली होती. आरोपी हितेशने त्याचे साथीदार विकास रा. गुलशननगर, वसंता हेडाऊ रा. बाराखोली यांच्यासह मारुती ओम्नी गाडीतून १.९० लाखाची विलायची, १.५१ लाखाची लवंग, ११ हजाराची दालचिनी असा २.६९ लाखाचा मुद्देमाल चोरला. गुन्ह्यातील २ लाख रुपये किमतीची मारुती ओम्नी जप्त करण्यात आली आहे.