शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: भाजपचा विरोध, तरीही नवाब मलिकांना उमेदवारी का दिली? अजित पवारांनी मांडली भूमिका...
2
“सांगली पॅटर्न लोकप्रिय नाही, मित्र पक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही अन्यथा...”: संजय राऊत
3
"आजपर्यंत राज ठाकरे नक्कल करायचे, आता...", अजित पवार यांचा शरद पवारांना टोला
4
Gold Price Outlook: पुढच्या दिवाळीपर्यंत सोनं १ लाखांपार जाण्याची शक्यता; चांदीचीही चमक वाढणार
5
Ajit pawar: शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का? अजित पवार म्हणाले, "राजकारणात काहीही होऊ शकते"
6
दिवाळीतील गुरुवार: इच्छा आहे, पण स्वामी सेवा शक्य होत नाही? ‘अशी’ करा स्वामी समर्थ मानसपूजा
7
शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गट एवढ्या मतदारसंघांत थेट भिडणार; कुठे कुठे लढाई ठरली...
8
मोठा खेळ झाला! माजी आमदार एक मिनिट लेट झाले, निवडणुकीचा अर्ज भरण्यास मुकले
9
अखेर तो क्षण आलाच.... तब्बल २८ वर्षांनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पुन्हा जुळून येणार योग
10
प्रेमप्रकरणातून रक्तरंजित संघर्ष! ३ महिलांसह पाच जणांची हत्या; लहान मुलांना ठेवलं ओलीस
11
Swiggy IPO: कधी येणार स्विगीचा आयपीओ, किती आहे प्राईज बँड? ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय, जाणून घ्या
12
अजित पवार गटाच्या बंडखोरीविरोधात शिंदेंची खेळी, या उमेदवारांना थेट हेलिकॉप्टरने पाठवले ए-बी फॉर्म
13
Elcid Investment : एका दिवसात ६६,९२,५३५% रिटर्न, 'हा' बनला भारतीय बाजारातील सर्वात महागडा स्टॉक; MRF ला टाकलं मागे
14
"...तेव्हा आपोआप हिंदू-मुस्लीम ऐक्य होईल!"; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी CM योगींना सांगितला फॉर्म्यूला
15
Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी स्नान करा, नाहीतर नरकात जावे लागेल; वाचा महत्त्व!
16
"२ कोटी द्या अन्यथा..."; सलमान खानला पुन्हा धमकी! अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
17
दिवसभर नॉट रिचेबल असलेले श्रीनिवास वनगा रात्री उशिरा घरी परतले, पण...
18
धनत्रयोदशीला भारतीयांची जोरदार खरेदी; ₹२०००० कोटींचं सोनं, ₹२५०० कोटींच्या चांदीची विक्री
19
IND vs NZ: मुंबईत गेली १२ वर्ष भारत अजिंक्य! शेवटचा विजय न्यूझीलंडविरूद्धच... पाहा आकडेवारी

"...तेव्हा आपोआप हिंदू-मुस्लीम ऐक्य होईल!"; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी CM योगींना सांगितला फॉर्म्यूला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 10:41 AM

Shankaracharya Avimukteswarananda : शंकराचार्य अविमुक्तेश्वानंद म्हणाले, 'बटेंगे तो कटेंगे' ही भविष्यकाळात होणारी क्रिया है. हा भविष्यातील शक्यतेचा इशारा आहे. याचा अर्थ आहे की, अद्याप आपल्यात फूट पडलेली नाही, मात्र याची शक्यता आहे. आपल्यात कशामुळे फूट पडेल, याचे कारण आपल्याला शोधावे लागेल.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे 'बटेंगे तो कटेंगे' विधान सातत्याने चर्चेत आहे. यातच आता शंकराचार्य अविमुक्तेश्वानंद सरस्वती यांनीही त्यांच्या विधानासंदर्भात भाष्य केले आहे. देशात ऐक्य आवश्यक असल्याचे म्हणत, यासाठी त्यांनी सरकारला एक फॉर्म्यूला देखील सांगितला आहे.

शंकराचार्य अविमुक्तेश्वानंद म्हणाले, 'बटेंगे तो कटेंगे' ही भविष्यकाळात होणारी क्रिया है. हा भविष्यातील शक्यतेचा इशारा आहे. याचा अर्थ आहे की, अद्याप आपल्यात फूट पडलेली नाही, मात्र याची शक्यता आहे. आपल्यात कशामुळे फूट पडेल, याचे कारण आपल्याला शोधावे लागेल.

सीएम योगी आणि भाजपला शंकराचार्यांचा प्रश्न -स्वामी अविमुक्तेश्वानंद सरस्वती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजप आणि आरएसएसला प्रश्न विचारताना म्हटले आहे की, आपल्याल जर ऐक्य आणायचे असेल तर फॉर्म्युला काय? ते म्हणाले, ''गायीला राष्ट्रमाता घोषित करा, गोहत्येला गुन्हा म्हणून घोषित करा. गाय माता आहे, हे जेव्हा संपूर्ण देशाला समजेल, तेव्हा संपूर्ण देश गाय आपली माता आहे, असे म्हणेल."  अविमुक्तेश्वानंद सरस्वती पुढे म्हणाले, जेव्हा दोघांचीही माता (गाय) एक होईल, तेव्हा दोघेही आपोआप भाऊ होतील. भावा-भावात ऐक्य होईल. यालाच बंधुत्व म्हणतात. हे गायीला राष्ट्रमाता घोषित करूनच होऊ शकते. एवढेच नाही, तर जनते समोर फुटीची कारणं ठेवावी लागतील, अशेही ते म्हणाले. 

काय म्हणाले होते योगी? - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका सभेला संबोधित करताना म्हणाले होते, "जेव्हा आपण संघटित राहू, आपल्यात नैतिकता असेल, तेव्हा राष्ट्र सशक्त होईल, फूट पडली तर कापले जाऊ (बटेंगे तो कटेंगे). बांगला देशात बघत आहात, ती चूक येथे व्हायला नको. एक राहू तर सुरक्षित राहू." योगींच्या या विधानानंतर राजकारण पेटले आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथHinduहिंदूMuslimमुस्लीमcowगाय