पाटणा : समाजाच्या कोणत्याही वर्गातील मुली आणि सुनांना विविध अन्याय व अत्याचारांपासून संरक्षण देण्यासाठी नक्षलवादाचे समर्थन करावे लागत असेल, तर होय, मीही नक्षलवादी आहे, असे उद्गार बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी काढले आहेत.नक्षलवादी गरीबीच्या आणि अन्याय-अत्याचाराच्या विरोधात लढतात. त्यांची ही राजकीय लढाई आहे, हे लक्षात ठेवायला हवे. त्यासाठी नक्षलवादी बळाचा वापर करीत असतील, त्यात चुकीचे काही नाही. एका कोटीच्या कामासाठी कोणी पाच कोटी रुपये घेत असेल, तर त्यांच्याकडून नक्षलवाद्यांनी खंडणी (लेव्ही) घेण्यात काही गैर नाही, असे आपले मत असल्याचेही मांझी यांनी सांगितले. जीतनराम मांझी यांच्या इमामगंज विधानसभा मतदारसंघात नक्षलवाद्यांनी अनेक पोस्टर्स चिकटवली आहेत. त्यानंतर मांझी यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारा परिषद घेतली आणि त्यात वरील विधाने केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
...तर मीही नक्षलवादी
By admin | Published: August 07, 2016 1:45 AM