उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे मागच्या दीड महिन्यापासून सुरू असलेला महाकुंभ आज समाप्त झाला. या महाकुंभमेळ्यामध्ये कोट्यवधी भाविकांनी पवित्र स्नान केलं. दरम्यान, सोशल मीडिया प्रभावी झाल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या या महाकुंभमेळ्यामधून अनेक जण प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यामध्ये हर्षा रिछारिया या तरुणीचाही समावेश आहे. महाकुंभमधून व्हायरल झालेल्या हर्षा रिछारियासाठी हीच प्रसिद्धी आता त्रासदायक ठरू लागली आहे. तसेच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करून जीवन संपवण्याची धमकी दिली आहे. मी टोकाचं पाऊल उचललं तर जीवन संपवण्यापूर्वी मला बदनाम करणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या लोकांची नाव एका चिठ्ठीत लिहून ठेवेन, असा इशारा तिने दिला आहे.
हर्षा हिने सांगितले की, सोशल मीडियावर तिचा एक एआय च्या माध्यमातून तयार केलेला बनावट व्हिडओ व्हायरल होत आहे. त्यामु ती त्रस्त झाली आहे. त्यानंतर हर्षा हिने भावूक होत एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात ती सांगते की, काही लोकांनी माझे जुने व्हिडीओ शेअर केले आहेत. आता तर काही जण एआयच्या माध्यमातूम बनावट व्हिडीओ तयार करून मला बदनाम करत आहेत.
हर्षा पुढे म्हणाली की, एक मुलगी पुढे जात आहे हे काही लोकांना आवडत नाही आहे. म्हणून हे लोक या माध्यमातून मला त्रास देत आहेत. मात्र जोपर्यंत माझे श्वास सुरू राहतील, तोपर्यंत मी सनातनसाठी काम करत राहीन. ज्या दिवशी तुम्हाला माहिती मिळेल की आता हर्षा या जगात नाही किंवा तिनं जीवन संपललंय, तेव्हा मी माझ्यासोबत कुणी काय केलं हे, एका चिठ्ठीमध्ये लिहून जाईन, असा इशाराच हर्षा रिछारिया हिने दिला आहे.