पाटणा - बिहारमधील जन अधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशातील सामाजिक वातावरण कलुषित झाले असून जिल्हाधिकारी अन् प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांना धमक्या देण्यात येत आहेत. यावरुन पप्पू यादव यांनी कडक शब्दात योगींवर प्रहार केला.
बिहारचे रहिवाशी असलेल्या पप्पू यादव यांनी योगींवर प्रहार केला. मी अन् योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे रहिवाशी असतो, तर योगींच्या छातीवर बसून त्यांची 32 हाडं तोडली असती, असे पप्पू यादव यांनी म्हटले. समस्तीपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. देशात जेव्हा अत्याचार वाढीस लागतो, तेव्हा कापसाप्रमाणे तो उडूनही जातो, असे म्हणत यादव यांनी योगी आदित्यनाथ यांना वेड्याचीही उपमा त्यांनी दिली.