शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"...तर मी विनेश फोगटला राज्यसभेवर पाठवलं असतं", काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 16:27 IST

Vinesh Phogat : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या कुस्तीतून निवृत्तीवर काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरलेल्या विनेश फोगाट हिला वजनी गटापेक्षा अधिक वजन भरल्याने स्पर्धेतून काल अपात्र ठरवण्यात आलं. या घटनेमुळं भारताचं स्पर्धेतील एक हक्काचं पदक हुकल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. ५० किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेश फोगाटचं काही ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. या घटनेनंतर विनेश फोगटनं कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. 

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या कुस्तीतून निवृत्तीवर काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विनेश फोगटला सुवर्ण पदक मिळालं पाहिजे. यासाठी ती हक्कदार आहे, याकडं सरकारनं लक्ष द्यावं. अशा प्रकारे अपात्र ठरवण्याची ही पहिलीच वेळ आहे, असं सांगत भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी आपल्याकडे संख्याबळ असते तर मी विनेश फोगटला राज्यसभेवर पाठवलं असतं, असं म्हटलं आहे.

महिलांच्या ५० किलो कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी वजन जास्त आढळल्याने विनेश फोगटला बुधवारी ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले. यानंतर विनेश फोगटनं कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. ती म्हणाली की, "आई, कुस्ती माझ्याकडून जिंकली, मी हरली. माफ कर, तुझं स्वप्न, माझं धैर्य, सर्व काही तुटलं, आता माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. कुस्ती २००१-२०१४ ला अलविदा. मी आपल्या सर्वांची सदैव ऋणी राहीन."

भारतीय कुस्ती संघाने केली होती अपीलविनेश फोगाटचं वजन फायनल मॅचपूर्वी १०० ग्रॅम अधिक आढळलं, ज्यामुळे विनेशला स्पर्धेतून अपात्र घोषित करण्यात आले. याबाबत भारतीय कुस्ती संघाकडून अपील करण्यात आलं होतं. विनेशला आणखी थोडा वेळ आणि सूट दिली जावी असं भारतानं म्हटलं. तर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन IOA ने विनेश रात्रभर तिचं वजन नियंत्रित करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत होती, परंतु सकाळी तिचं वजन १०० ग्रॅम अधिक असल्याचं निदर्शनास आलं. 

टॅग्स :congressकाँग्रेसparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Vinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्ती