मुंबई : विख्यात गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी एका भारतीय वंशाच्या ब्रिटिश गुंतवणूकदाराच्या प्रश्नाला चोख प्रत्यूत्तर दिले आहे. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरममध्ये शुक्रवारी चर्चा झाली. यावेळी झुनझुनवाला यांच्यासोबत वाद झाला.
फोरमच्या पॅनलमधील गुंतवणूकदार सुभाष ठकरार यांनी झुनझुनवाला यांना लक्ष्य करताना भारतातील बेरोजगारीवरून वारंवार प्रश्न विचारत होते. ठकरार लंडन चेम्बर ऑफ कॉमर्सचे माजी संचालकही होते.
झुनझुनवाला यांनी सांगितले की, मजबूत विकास दर हाच बेरोजगारीवरील तोडगा आहे. ठकरार यांनी त्यांना रोखत गेल्या दशकापासून अर्थव्यवस्था चांगली असताना बेरोजगारी वाढली कशी, यावर झुनझुनवाला त्रस्त झाले. त्यांनी ठकरार यांना रोखत जर भारत गुंतवणुकीसाठी चांगला वाटत नसेल तर पाकिस्तानमध्ये जाऊन गुंतवणूक करा असा सल्ला दिला.