शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

... तर मोदींच्या प्रतिमेस धक्का बसेल, शिवसेनेनं करुन दिली त्या भाषणाची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 8:29 AM

चीनमधील घटनेनंतर गलवान खोऱ्यातील तणाव संपविण्यासाठी भारत व चीनच्या मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अमेरिकेसारख्या मस्तवाल महासत्तेलाही न जुमानणार्‍या चीनची स्वतःची एक जागतिक फळी आहे

मुंबई - भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चीनने सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्याला भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात ३५ चिनी सैनिकगंभीर जखमी किंवा मृत झाले असल्याची माहिती अमेरिकी गुप्तचर यंत्रणच्या हवाल्याने देण्यात आली आहे. भारत व चिनी सैनिकांमध्ये सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात भारताचे एका कर्नलसह २० जवान शहीद झाले होते. गेल्या पाच दशकांमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये इतकी मोठी चकमक पहिल्यांदाच घडली आहे. या चकमकीनंतर शिवसेनेनं चीनचा हल्ला म्हणत मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच, चीन हा पाकिस्तानसारखा नसून जागतिक पातळीवर ठसा उमटलेला देश आहे, असे शिवसेनेनं म्हटलंय.   

चीनमधील घटनेनंतर गलवान खोऱ्यातील तणाव संपविण्यासाठी भारत व चीनच्या मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अमेरिकेसारख्या मस्तवाल महासत्तेलाही न जुमानणार्‍या चीनची स्वतःची एक जागतिक फळी आहे. चीन साम्राज्यवादी आणि घुसखोर आहे . त्याने हिंदुस्थानवर आधीच अतिक्रमण केले आहे. लडाखच्या हिंदुस्थानी हद्दीत घुसून चीनने जो हल्ला केला तो एक इशारा आहे. दिल्लीत बैठका आणि चर्चा सुरू आहेत . तणाव कोणालाच नको आहे. सध्याच्या काळात तो कोणालाच परवडणारा नाही, पण 20 जवानांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे काय ? प्रतिकार झालाच नाही तर मोदी यांच्या प्रतिमेस त्यामुळे धक्का बसेल, असे म्हणत शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टार्गेट केलं आहे. 

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बाण सोडण्यात आले आहेत. 'सीमेवरील संघर्षाची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागते. चीनबरोबर जो संघर्ष आज सुरू आहे त्याचे कूळ आणि मूळ पंडित नेहरूंच्या फसलेल्या परराष्ट्र धोरणात आहे असे जाहीर सभांतून सांगितल्याने टाळ्या मिळतील, पण आज जवानांची बलिदाने सुरू आहेत ती थांबवण्याची जबाबदारी मोदी सरकारचीच आहे. 'गडबड सीमेवर नसून दिल्लीत आहे. दिल्लीची सरकारे नामर्द आहेत म्हणून सीमेवर शत्रू अरेरावी करतो', असे सहा वर्षांपूर्वी जोरकसपणे सांगणारे नरेंद्र मोदी आज दिल्लीचे सर्वसत्ताधीश आहेत. त्यामुळे आज जे घडले आहे त्याचा प्रतिकार मोदींनाच करावा लागेल.', असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून मोदींना त्यांच्या जुन्या भाषणाची आठवण करुन देण्यात आली आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर मोदींचं हे भाषण व्हायरल होत आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीSanjay Rautसंजय राऊत