लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दुसरीकडे लोकसभेत संविधानावर चर्चा करताना प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य करताना लोकसभा निवडणूक निकालाचा हवाला दिला. लोकसभेचा निकाल वेगळा लागला असता, तर सरकारने संविधान बदलण्याचे काम केले असते, असा आरोप गांधी यांनी केला.
हे सरकार भीती पसरवणारे सरकार आहे. देशाचे संविधान हे संघाचे विधान नाही, हे कदाचित पंतप्रधानांना अद्याप समजले नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. भारत कधीच दिर्घ काळ भ्याड लोकांच्या ताब्यात नव्हता. त्यामुळे तो जागा होईल व लढेल. जाती जनगणना, महिला अत्याचार, मणिपूर, संभलमधील हिंसाचार यासह विविध मुद्द्यांचा उल्लेख त्यांनी केला
स्वातंत्र्य व देश उभारणीत पंडित जवाहरलाल नेहरुंचे योगदान नाकारले जावू शकत नाही. नेहरुजींनी काय केले, हे विचारण्यापेक्षा तुम्ही काय केले ते देशाला सांगा. - खा. प्रियांका गांधी
राहुल गांधींकडून कौतुकप्रियांकाचे भाषण मी सभागृहात केलेल्या भाषणापेक्षा कितीतरी चांगले असल्याचे नमूद करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी बहिणीचे कौतुक केले.