नवी दिल्ली- अयोध्येत राम मंदिराची उभारणी व्हायला हवी. यासाठी सरकारनं कायदा करायला हवा, असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल्यानंतर एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आरएसएस आणि त्यांच्या सरकारला अयोध्येत राम मंदिर बांधण्यापासून कोण अडवतं आहे. त्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधून दाखवावं. भाजपाला देशात धार्मिक विविधता नको, त्यांना उदारमतवाद नको. भाजपाला देशात एकाधिकारशाही राबवयाची आहे. त्या पक्षाचा विविधता आणि कायद्यावर विश्वास नाही, असंही ओवैसी म्हणाले आहेत.
गेल्या काही वेळीपूर्वीच संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिरच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर ओवैसींची प्रतिक्रिया आली आहे. सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते, राम मंदिराच्या उभारणीसाठी सरकारनं कायदा करायला हवा. कोणत्याही मार्गानं राम मंदिराची उभारणी व्हायला हवी.