जिल्ाला आणखी एक लाल दिवा खडसेंचे सूतोवाच: जावळेंना संधी
By admin | Published: February 16, 2016 12:37 AM
जळगाव : राज्यात लवकरच केळी उत्पादक महामंडळाची स्थापना होणार असून त्याचे अध्यक्षपद आमदार हरिभाऊ जावळे यांना देण्यात येणार असल्याचे सूतोवाच महसूल तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे सोमवारी केले.
जळगाव : राज्यात लवकरच केळी उत्पादक महामंडळाची स्थापना होणार असून त्याचे अध्यक्षपद आमदार हरिभाऊ जावळे यांना देण्यात येणार असल्याचे सूतोवाच महसूल तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे सोमवारी केले. भाजपा जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली. जळगाव जिल्हा केळी उत्पादनात राज्यात आघाडीवर आहे. येत्या दोन ते अडीच महिन्यात राज्य पातळीवर केळी विकास महामंडळ स्थापन होणार आहे. या महामंडळाच्या माध्यमातून केळी संशोधन, विकास, प्रक्रिया उद्योग यासाठी पुढाकार घेतला जाईल. या महामंडळास राज्य शासनाकडून भागभांडवल दिले जाणार आहे. कृषि संशोधन विकास संस्था मुंबई व दिल्लीकडूही या मंहामंडळास मदत मिळू शकेल. महामंडळाच्या निर्मितीच्या हालचाली सुरू झाल्या असून अध्यक्षपदी रावेर विधानसभा मतदारसंघातील आमदार हरिभाऊ जावळे यांना संधी दिली जाणार असल्याचे सूतोवाच खडसे यांनी केले. या माध्यमातून जळगाव जिल्ास आणखी एक लाल दिवा मिळेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.