नवी दिल्ली : गेली दाेन वर्षे सणासुदीच्या हंगामात काळजावर दगड ठेवून हात आखडता घेत लाेकांनी खरेदीवर नियंत्रण ठेवले. मात्र, यावर्षी चित्र पूर्णपणे वेगळे आहे. दाेन वर्षांची भरपाई करण्याच्या मूडमध्ये जनता जनार्दन असून, सणासुदीमध्ये यंदा तब्बल अडीच लाख काेटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल हाेण्याची अपेक्षा आहे.
अखिल भारतीय ट्रेडर्स महासंघाने हा अंदाज व्यक्त केला असून, एवढ्या माेठ्या प्रमाणात उलाढाल झाल्यानंतर व्यापाऱ्यांना आर्थिक संकटावर मात करणे शक्य हाेणार आहे. दिवाळीला आठवडाअखेरीस सुरुवात हाेणार आहे. दिवाळीच्या तयारीसाठी १५ आणि १६ ऑक्टाेबरच्या शनिवार आणि रविवारचा लाेकांनी पुरेपूर लाभ घेतला. देशभरात सर्वत्र दिवाळी खरेदीचा सुपर संडे साजरा झाला.
यामुळे वाढला उत्साहकेंद्र सरकारने महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवला. याशिवाय रेल्वे कर्मचाऱ्यांनाही बाेनस जाहीर केला आहे. खासगी क्षेत्रातही चांगली पगारवाढ झालेली आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना बाेनसही दिला आहे.
वाहन विक्री टाॅप गिअरमध्येदसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन विक्रीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. दुचाकी वाहनांसह सेदान कार आणि एसयुव्ही वाहनांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसला हाेता. दिवाळीलाही हाच कल राहण्याचा अंदाज आहे.
ऑनलाइन जोरातलाेकांचा टीव्ही, घरगुती उपकरणे, कपडे, माेबाईल, संगणक, लॅपटाॅप, साेने तसेच वाहन खरेदीकडे कल आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून यावेळी हाेणाऱ्या विक्रीत ८ ते १० टक्के वाढ दिसून येत आहे.
साेन्याची ‘लूट’दसऱ्याला गेल्या वर्षीच्या तुलनेत लाेकांनी ३० टक्के अधिक साेने खरेदी केली. यंदा साेने ५० हजार प्रती ताेळ्याच्या जवळपास हाेते. हे पाहता दिवाळीमध्ये साेन्याची ‘लूट’ दिसू शकते.