इंडिगो विमानातील पायलटसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या घटनेवरून काँग्रेसने केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. देशातील प्रत्येक विमानतळावर अराजक असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. प्रवासी चिंतेत पडलेले दिसतात. मात्र सरकारने मौन बाळगले आहे. काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले की, विमान आणि विमानतळ आणि एरोब्रिजमध्ये तासनतास अडकलेल्या संतप्त प्रवाशांच्या तक्रारींनी विमानतळ आणि सोशल मीडिया गुंजत आहे. जास्त उशीर, प्रतिसाद न देणारी ग्राहक सेवा आणि विमान कंपन्यांची संपूर्ण बेजबाबदारता यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अशा प्रवाशांना डीजीसीए इंडिया आणि विमान वाहतूक मंत्री यांना टॅग करणे भाग पडते.
मात्र, मंत्री, मंत्रालय आणि माध्यमांनी मौन बाळगले आहे. जर काँग्रेस सरकारमध्ये असती, तर या परिस्थितीचे 24/7 नॉन-स्टॉप मीडिया कव्हरेज झाले असते आणि हे योग्यही आहे.
इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटला उशीर होत असताना एका प्रवाशाने पायलटला धक्काबुक्की केली. या घटनेशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, यामध्ये एक प्रवासी पायलटवर हल्ला करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये प्रवासी 'तुम्हाला विमान चालवायचे असेल तर चालवा, नाहीतर खाली उतरा' असे म्हणताना ऐकू येत आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता नेटकरी त्या प्रवाशाविरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहेत. विमान उड्डाणाची वेळेवर घोषणा होत नसल्याने प्रवासी संतप्त झाले. मात्र, प्रवाशांमध्ये निराशा असल्याचे काही जणांनी सांगितले. यात काहींचे म्हणणे आहे की, उड्डाणे रद्द होत आहेत, अनावश्यक विलंब होतो आणि मानकांची पूर्तता केली जात नाही. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार आली असून एफआयआरही नोंदवण्यात आला आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; ८ दिवस अखंड रामनाम जप, ११ यजमान करणार ४५ नियमांचे कठोर पालन
व्हिडिओमध्ये कॅप्टन विलंबाबाबत घोषणा करताना दिसत आहे. दरम्यान, अचानक एक प्रवासी कॅप्टनच्या दिशेने धावतो आणि त्याच्या तोंडावर चापट मारतो. कॅप्टनच्या जवळ उभा असलेला फ्लाइट अटेंडंट लगेच त्याच्या बचावासाठी येतो आणि कॅप्टनसमोर उभा राहून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर स्काय ब्लू हुडी घातलेल्या दुसऱ्या व्यक्तीने प्रवाशाला मागे खेचले. त्यानंतर केबिनमध्ये एकच गोंधळ उडाला.