नवी दिल्ली : पुणे विमानतळाचे नाव लोकमान्य टिळक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे केंद्र सरकारने सोमवारी स्पष्ट केले. नागरी उड्डयण मंत्रालयाने राज्यसभेत स्पष्ट केले की, विमानतळांचे नामकरण, नाव बदलणे याबाबत विधानसभेत मंजूर झालेल्या प्रस्तावासह राज्य सरकारने शिफारस केल्यास यावर विचार केला जातो.
असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पाठविला आहे काय, असा मुद्दा प्रकाश जावडेकर यांनी उपस्थित केला होता.