- सुरेश भुसारी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली तरी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाला कोणताही धोका नसल्याचे मत राज्यघटनेच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले. चाैकशीनंतर मुख्यमंत्र्यांना अटक झाल्यानंतर दिल्ली सरकारमध्ये घटनात्मक पेच निर्माण होईल काय? दिल्ली सरकार अस्थिर होईल काय, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. यासंदर्भात राज्यघटनेचे तज्ज्ञ डॉ. सुभाष कश्यप ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, सीबीआयने केजरीवाल यांना केवळ समन्स पाठविला आहे. त्यांना अटक झाली तरी त्यांना राजीनामा देण्याची कोणतीही गरज नाही. राज्यघटनेच्या तरतुदीनुसार अटक झाल्यानंतरही केजरीवाल मुख्यमंत्रिपदावर कायम राहू शकतात, असे कश्यप यांनी सांगितले.
मुख्यमंत्रिपदावर असताना जयललितांना कारावास- तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदावर असताना जे. जयललिता यांना १९९६ मध्ये कारावास झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता.-रंगीत टीव्ही खरेदीप्रकरणी जयललिता यांना शिक्षा झाली होती. यानंतर मुख्यमंत्रिपदावर असताना कोणत्याही व्यक्तीला अटक किंवा कारावास झालेला नाही.