ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - केंद्र सरकारने 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्याच्या निर्णयानंतर संपूर्ण देशात जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जनतेचा त्रास कमी करण्यासाठी काही राजकीय संगठनांनी पाणी वाटप, वडापाव वाटप तर वेदनांचा त्रास कमी करण्यासाठी झंडू बाम देखील वाटप केला जात आहे.
अनेक शहरांतील मोजक्याच ATM केंद्रांवर नोटा शिल्लक असल्याने तेथे भली मोठी लाईन असते. काही ठिकाणी नो कॅशचे बोर्ड लागले आहेत, तर काही ATM केंद्रांचे शटरच बंद पाहवयास मिळताहेत. ग्राहकांची या त्रासामुळे दमछाक होत असून आता जनतेच्या सोयीसाठी एक नवीन सेवा इंटरनेटच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांनी फक्त आपल्या परिसराचा PIN CODE टाकायचा असून यामध्ये त्यांना दिसेल की त्यांनी टाकलेला पिनकोडच्या भागात कुठल्या ATM केंद्रावर रक्कम शिल्लक आहे . यासाठी केवळ http://cashnocash.com या वेबसाईटवर जाऊन पिनकोड नमूद करण्याची आवश्यकता आहे.