ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13- इंडियन रेल्वे 1 जुलैपासून सध्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करते आहे, असं वृत्त काही दिवसांपासून प्रसारीत होत होतं. पण इंडियन रेल्वे त्यांच्या तात्काळ तिकिटांच्या किंवा इतर कुठल्याही नियमांमध्ये बदल करत नसल्याचं स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाने दिलं आहे. रेल्वेच्या नियमांमध्ये 1 जुलैपासून बदल होतील, अशा बातम्या येत आहेत. पण असे कोणतेही बदल होणार नसल्याचं रेल्वेने म्हंटलं आहे. कॅशलेश तिकीट विक्रीवर असणाऱ्या नियमांमध्येही बदल केले जाणार आहेत तसंच रेल्वेचं तात्काळ तिकीट रद्द केल्यास 50 टक्के पैसे प्रवाशांना रिफंड केले जातील, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती.
"गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर, व्हॉट्सअॅफ ग्रुपमध्ये आणि काही वेबसाइट्सवर इंडियन रेल्वे नवे नियम लागू करणार असल्याची माहिती प्रसारीत होत असल्याचं निदर्शनास आलं. 1 जुलै 2017 पासून रेल्वे नवे नियम लागू करेल असंही बोललं जात होतं. पण ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. या बातमीमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असं स्पष्टीकरण रेल्वेने 30 जून रोजी दिलं आहे. तसंच तात्काळा तिकीट बुक करण्यासाठी आधीचेच नियम लागू असतील असंही रेल्वेने सांगितलं आहे.
तात्काळ तिकीट बूक करण्यासाठी रेल्वेने 2015मध्ये नियम बदलला होता. एसीचं तात्काळ तिकीट बुकिंग सकाळी दहा वाजता आणि नॉन-एसीचं तिकीट बुकिग सकाळी अकरा वाजता सुरू होणार. प्रवासाच्या एक दिवस आधी प्रवाशाला तात्काळ तिकीट बूक करणं गरजेचं आहे. या नियमामध्ये कोणताही बदल होणार नाही, असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
तसंच तात्काळ तिकीट रद्द केल्यावर तिकिटाचे पैसे परत मिळण्याच्या नियमामध्ये कोणताही बदल होणार नाही. तात्काळ तिकीट रद्द केल्यावर तिकीटाचे पैसे प्रवाशाला परत मिळणार नाहीत. हा नियम आधीप्रमाणेच लागू आहे.
तात्काळ ई-तिकीट बूक करताना प्रत्येक पीएनआरवर दराने जास्तीत जास्त चार प्रवाशांचं तिकीट बूक करता येइल.
1 जुलै 2017 पासून कोणतेही नवे नियम नाहीत. फक्त इतर विभागांप्रमाणे रेल्वेही जीएसटीची 1 जुलैपासून अंमलबजावणी होणार आहे.
रेल्वेकडून वेटिंग तिकिटाची यादी ऑनलाइन तसंच रेल्वे स्टेशनवर जारी केली जाइल. या नियमातही बदल नसेल.