ऑनलाइन लोकमत
हिंडोन, दि. 8 - नियंत्रण रेषा पार करुन करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर खूप चर्चा झाली आहे. मात्र सैन्य चर्चेत वेळ वाया घालवणार नाही, थेट कृती करेल असं वक्तव्य हवाई दलाचे प्रमुख अरुप राहा यांनी केलं आहे. भारतीय सैन्य कोणतंही आव्हान स्विकारण्यास तयार असल्याचंही अरुप राहा बोलले आहेत.
सर्जिकल स्ट्राईकवर देशभरात खुप चर्चा झाली आहे. प्रत्येकजण या विषयावर आपलं मत व्यक्त करत आहे. भारतीय सैन्यांनी देशवासियांना असलेल्या अपेक्षेप्रमाणे निकाल दिला पाहिजे. आम्ही यावर चर्चा करणार नाही, कृती करु असं अरुप राहा बोलले आहेत.
सर्जिकल स्ट्राईकवरुन सुरु असलेल्या राजकारणावर अरुप राहा यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्यांनी यासंबंधी काहीही वक्तव्य करण्यास नकार दिला.
84वा एअरफोर्स फाउंडेशन डे' उत्साहात साजरा -
गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर 84 वा 'एअरफोर्स फाउंडेशन डे' उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वायुसेनेने चित्तथरारक कसरती सादर करत शक्तिप्रदर्शनही केले. एअरफोर्सचे प्रमुख अरुप राहा यांच्यासोबात लष्कर आणि नौदलाचे प्रमुखदेखील उपस्थित होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरदेखील यावेळी हजर होता. एअरफोर्सचे प्रमुख राहा यांनी यावेळी वायु सेना मेडल्स, वायु सेना मेडल्स (Gallantry) आणि विशिष्ट सेवा मेडल्स प्रदान करुन जवानांचा गौरव केला. 84वा 'एअरफोर्स फाउंडेशन डे' निमित्त राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन शुभेच्छाही दिल्या.
#WATCH: IAF'S Sarang Helicopter Display Team in action at Air Force Day celebrations at Hindon Air Base in Ghaziabad pic.twitter.com/FWxhCUsffJ— ANI (@ANI_news) October 8, 2016
#WATCH: PC-7 Aircraft shows its prowess at Air Force Day celebrations at Hindon Air Base in Ghaziabad pic.twitter.com/90uO9cS77N— ANI (@ANI_news) October 8, 2016