शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

सोनियांच्या सभेला गर्दी;पण काँग्रेसमध्ये जोश नाही

By admin | Published: February 04, 2015 2:55 AM

सोनिया गांधी यांच्या सभेला माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी हजेरी लावल्यामुळे काँग्रेसचे प्रचार व्यवस्थापक विशेषत: समितीचे अध्यक्ष अजय माकन यांना धक्का बसला आहे.

नबीन सिन्हा - नवी दिल्लीकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची दिल्लीतील बद्रापूर येथील सभा यशस्वी होऊनही पक्षात हवा तसा जोश आलेला नाही. सरचिटणीस पी. सी. चाको यांनी अन्य राज्यांमधील विविध नेत्यांची मदत घेण्याची योजना आखल्याचे पाहता काँग्रेसने हे आव्हान पेलण्यासाठी धडपड चालविल्याचे दिसते.सोनिया गांधी यांच्या सभेला माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी हजेरी लावल्यामुळे काँग्रेसचे प्रचार व्यवस्थापक विशेषत: समितीचे अध्यक्ष अजय माकन यांना धक्का बसला आहे. काँग्रेसने आजवर शीला दीक्षित यांच्यापासून अंतर राखले होते. त्यांची प्रचाराची मदत घेण्याचा आदेशही देण्यात आला नव्हता. दीक्षित यांची मदत घेणे पक्षाला महागात पडू शकते, असे विधान माकन यांच्याशी जवळीक असलेल्या एका नेत्याने केले आहे. नवी दिल्ली मतदारसंघात आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या काँग्रेसच्या उमेदवार किरण वालिया यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेस नेत्यांना धक्का बसला आहे. डिसेंबर २०१३ मध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या सभांना गर्दी नव्हती. याउलट आता चांगला प्रतिसाद मिळत आहे; मात्र अजूनही दिल्लीतील हवा काँग्रेसला अनुकूल बनलेली नाही. कार्यकर्त्यांमध्ये पूर्वीसारखा उत्साह नाही, असे एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले.दुहेरी आकडा गाठण्याचे आव्हानडिसेंबर २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पार वाताहत झाली. पक्षाला केवळ आठ जागा मिळाल्या. पक्षासमोर आता दुहेरी आकडा गाठण्याचे आव्हान आहे. हारुन युसूफ आणि माकन यासारखे नेते तिरंगी लढतीत अडकले आहेत. कोणत्याही मतदारसंघात काँग्रेससाठी विजय सोपा नाही. भाजपमध्ये घसरण झाली तरी त्याचा लाभ केवळ आम आदमीलाच होईल, असा दावा एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर केला.काँग्रेसने केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग तसेच बिहार, उत्तर प्रदेश व प. बंगालमधील नेत्यांना विविध भागांत प्रचाराला लावले. माजी खासदार आणि माजी मंत्र्यांचीही मदत घेण्याची योजना आहे. माजी खासदार जे. पी. अग्रवाल वगळता कपिल सिब्बल, संदीप दीक्षित यांच्यासारख्या नेत्यांनी स्वत:ला प्रचारापासून दूर ठेवले आहे.