नवी दिल्ली : येत्या १ डिसेंबरपासून ‘आधार’ कार्ड असल्याशिवाय कोणालाही स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून गॅस ग्राहकांना ‘आधार’साठी नोंदणी करण्याची दोन महिन्यांची शेवटची मुदत दिली आहे.सरकारी योजनांचे लाभ आणि अनुदान यासाठी ‘आधार’चा वापर करण्यासंबंधीचा कायदा १६ सप्टेंबरपासून लागू करण्यात आला असून त्यानुसार तेल मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आसाम, मेघालय आणि जम्मू-काश्मीर ही राज्ये वगळून देशभर लागू होईल.सध्या सरकार घरगुती गॅस ग्राहकास वर्षाला स्वयंपाकाच्या गॅसचे १२ सिलिंडर अनुदानित दरात देते. अनुदानाची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते व त्याने गॅस सिलिंडर घरी आल्यावर त्याची पूर्ण किंमत द्यायची असते. नव्या आदेशानुसार ज्या गॅस ग्राहकांनी अद्यापही ‘आधार’ कार्ड घेतलेले नाही त्यांना नोंदणी करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘आधार’शिवाय गॅस अनुदान नाही
By admin | Published: October 05, 2016 5:52 AM