श्रीनगर : सैनिक कॉलनीवरून वाद सुरू झाला असतानाच मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी येथे स्पष्ट केले की, सैनिक कॉलनीसाठी कोणत्याही प्रकारे भूमी अधिग्रहण करण्यात आलेले नाही. पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, सैनिक कॉलनीसाठी कोणत्याही प्रकारे भूमी अधिग्रहण करण्यात आलेले नाही. सैनिक कॉलनीची मागणी राज्याच्या बाहेरून आलेल्या माजी सैनिकांनी केलेली नाही, तर हा राज्याशी संबंधित प्रश्न आहे. माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या आरोपांना उत्तर देताना महबूबा मुफ्ती म्हणाल्या की, कोणतीही शक्ती राज्याच्या विशेष दर्जाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. उमर अब्दुल्ला यांनी आरोप केला होता की, या कॉलनीसाठी भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया पीडीपी - भाजपाच्या सरकारच्या काळात सुरू झालेली आहे. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, उमर हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यांना हे ठाऊक आहे की, मुख्यमंत्री असो अथवा पंतप्रधान ते राज्याच्या विशेष दर्जाच्या विरुद्ध जाऊ शकत नाहीत.
सैनिक कॉलनीसाठी भूमी अधिग्रहण नाही
By admin | Published: May 10, 2016 3:14 AM