नवी दिल्ली : राम मंदिरासाठी वटहुकूम काढणार नाही, जीएसटीमुळे काही काळ उद्योग व व्यवसायांचे नुकसान झाले असले, तरी आता अर्थव्यवस्था पूर्वपदावर आली आहे, जीएसटीचा निर्णय सर्व राजकीय पक्षांनी मिळूनच घेतला होता. दोन युद्धांनंतरही पाकिस्तान सुधारण्याची शक्यता नाही, त्यामुळे पुन्हा एकवार सर्जिकल स्ट्राइकची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगतानाच स्वत:ला देशाची फर्स्ट फॅमिली समजणारे गांधी घराणे आर्थिक गैरव्यवहारांमुळे जामिनावरच बाहेर आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत, मुलाखतीला घाबरतात, केवळ सभांमध्ये भाषणे करतात, अशी टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी दिलेल्या सविस्तर मुलाखतीत प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे तुमच्यावर पहारेकरी चोर असल्याची टीका करीत आहेत, अन्य मित्रपक्षही तुमच्यापासून दूर जात आहेत, असे विचारता, ते म्हणाले की, प्रत्येक पक्षाला स्वत:ची ताकद वाढवायची असते. ते स्वाभाविकच आहे. त्यामुळे हे असे होतच राहील, पण २०१९ ची निवडणूक ही ‘मोदी विरुद्ध कुणीतरी’ अशी होणार नसून, ती ‘जनता विरुद्ध महाआघाडी’ अशी होईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी मोदी म्हणाले की, अनेकदा शेतकºयांना कर्जमाफी दिली गेली, पण प्रश्न सुटला नाही. शेतकºयांच्या आत्महत्या संपलेल्या नाहीत. ज्या सरकारांना कर्जमाफी द्यायची आहे, त्यांनी ती अवश्य द्यावी. पण शेतकºयांना त्यांच्या मूळ समस्येतून दूर करायला हवे. त्यासाठी त्यांच्या शेतमालाला अधिक भाव मिळायला हवा. त्यांना शेतीसाठी वाजवी भावात पाणी, वीज, बियाणे, खते मिळायला हवीत. शेतमाल खरेदीची हमी हवी आणि त्यातून त्यांचे उत्पन्न वाढेल, अशी कायमस्वरूपी व्यवस्था हवी. ती होईल, तेव्हाच त्यांचे प्रश्न सुटू शकतील.
नोटाबंदी हा झटका नव्हता. आम्ही वर्षभर त्याबाबतचा इशारा दिलाच होता. काळा पैैसा बँकांत जमा करा, त्यावरील दंड भरा आणि मोकळे व्हा, असे काळा पैसावाल्यांना आम्ही समजावले होते. पण साºया सरकारांप्रमाणेच आम्ही वागू असे त्यांना वाटत होते. त्यामुळे सर्वांनी काळा पैसा बँकांत जमा केला नाही. त्यामुळे नोटाबंदी करण्याची वेळ आली, असा खुलासा मोदी यांनी केला.मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या बालेकिल्ल्यांमध्ये काँग्रेसने भाजपाला हादरा दिला. तिन्ही राज्यांमधील सत्ता भाजपाला गमवावी लागली. त्याविषयीच्या प्रश्नावर पंतप्रधान उत्तरले की, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील पराभवासाठी १५ वर्षांची अँटी इन्कम्बन्सीही (सरकारविरोधी लाट) कारणीभूत होती. अर्थात आम्ही कुठे कमी पडलो यावर विचार करून पुढची आखणी करू. मात्र छत्तीसगडमध्येच आमचा खºया अर्थाने पराभव झाला. राजस्थान व मध्य प्रदेशात कोणालाच स्पष्ट बहुमत मिळालेले नाही, हे विसरून चालणार नाही. तेलंगणा व मिझोरममध्ये सत्तेवर येण्याचा विचार मी वा भाजपाच्या नेत्याने केलाही नव्हता. तीन राज्यांतील पराभवांमुळे आमचे मनोधैर्य अजिबात खच्ची झालेले नाही आणि २०१९ मध्ये जनता आम्हालाच विजयी करेल, अशी मला खात्री आहे.निवडणुका जिंकणे वा हरणे हाच राजकारणातील एकमेव मापदंड नसतो, असे सांगून मोदी म्हणाले की, याच काळात हरयाणात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही जिंकल्या. त्रिपुरामध्ये ९०-९५ टक्के यश मिळवले आणि जम्मू-काश्मीरमधील स्थानिक निवडणुकांमध्येही आम्हाला मोठे यश मिळाले. गोहत्येच्या निमित्ताने झुंडींकडून होणाºया हत्यांचा आपण निषेध करतो, असेही त्यांनी सांगितले.
राफेल प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तुमच्यावर सतत आरोप करीत आहेत, तुम्ही अनिल अंबानी यांना मदत केल्याची टीका त्यांनी केली आहे, या प्रश्नावर मोदी म्हणाले की, राफेल प्रकरणात माझ्यावर आरोप झालेले नाहीत. जे आरोप झाले ते सरकारवर होते. संसदेत राफेल करारावर आम्ही उत्तर दिले. एवढेच नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणात काही गैर झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. फ्रान्सच्या राष्ट्रपतींनीही मीही उत्तर दिले आहे. त्यामुळे त्याच विषयावर वारंवार बोलण्याची गरज नाही. मुळात संरक्षण खरेदीत दलाल का आहेत, हा प्रश्न आपण आपल्याला विचारायला हवा. या दलालांमुळेच लाच, भ्रष्टाचार, आरोप-प्रत्यारोप हे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे संरक्षण खरेदीतील दलाल हा घटकच संपवून टाकणे आवश्यक आहे.ज्या घराण्याच्या चार पिढ्यांनी देशावर राज्य केले आणि जे स्वत:ला भारतातील ‘फर्स्ट फॅमिली’ मानतात, ते सध्या जामिनावर आहेत. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर आरोप आहेत. जी मंडळी त्यांच्यामागे उभी आहेत, ती सत्य लपवून वेगळ्याच गोष्टी पुढे करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
आम्ही जेव्हा कॉग्रेसमुक्त भारत म्हणतो, तेव्हा आम्हाला तो पक्षच नको, असे म्हणायचे नसते. काँग्रेसने रुजवलेली हुजरेगिरी, भ्रष्टाचार, घराणेशाही ही संस्कृती नको, असे आमचे म्हणणे असते. ते आम्ही यापुढेही मांडत राहू, असे मोदी यांनी स्पष्ट केले.पहारेकरी चोर असल्याच्या उद्धव ठाकरे यांच्याविषयी विचारता मोदी यांनी प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची असते. त्यांनाही पक्ष वाढवायचा आहे, असे मोघम उत्तर दिले. मात्र शिवसेनेशी युती गरजेची असल्याचे सांगत भाजपाची भूमिका काहीशी सौम्य झाल्याचे संकेत दिले.
आम्हाला २0१४ साली स्पष्ट बहुमत मिळाले होते. तरीही आम्ही सर्व मित्रपक्षांशी युतीच्या धर्माचे पालन केले. त्यांच्या सहमतीनेच सारे निर्णय घेतले, असे सांगून मोदी म्हणाले की, राज्यांमधील राजकारण वेगळे असते. आमच्याबरोबर युतीत असलेल्या प्रादेशिक पक्षांनी मोठे व्हावे, असे आम्हालाही वाटते. काही प्रादेशिक नेत्यांना वाटते की दबाव आणल्यास फायदा होईल, तर काही जण चर्चा, सामोपचाराचा मार्ग निवडतात. मात्र प्रादेशिक पक्षांच्या महत्त्वाकांक्षा आपण विसरून चालणार नाही. त्यांना त्यांचे महत्त्व मिळायलाच हवे.ऊ र्जित पटेल यांना राजीनामा देण्यास सरकारने अजिबात सांगितले नाही वा तसा दबावही आणला नाही, असा खुलासा करताना पंतप्रधान म्हणाले की, सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी आपण रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. गव्हर्नर म्हणून त्यांनी खूपच चांगले काम केले.
सर्जिकल स्ट्राइकविषयीच्या प्रश्नावर मोदी यांनी अतिशय सविस्तर उत्तर दिले. ते म्हणाले की, स्ट्राइक झाल्यानंतर संरक्षण दलाच्या प्रमुखांनी आधी पाकिस्तानला कळविले आणि मगच आम्ही प्रसारमाध्यमांना व देशाला सांगितले. त्याच दिवशी दुर्दैवाने विरोधी पक्षांनी या स्ट्राइकविषयी शंका घेतल्या. स्वत:च्या आरोपांपुष्ठ्यर्थ विरोधकांनी पाकिस्तानच्या वक्तव्यांचे साह्य घेतले. तेच नेमके पाकला हवे होते. पण आॅपरेशन सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत, कारवाईत सहभागी झालेला प्रत्येक जवान परत येईपर्यंत मी लष्करप्रमुखांच्या संपर्कात होतो, असे सांगून ते म्हणाले की, एक वेळ आॅपरेशन पूर्ण वा यशस्वी झाले नाही तरी चालेल, पण आपला एकही जवान जायबंदी होता कामा नये, अशी माझी भूमिका होती. सारे जवान परतल्यानंतरच माझ्या जीवात जीव आला.
एका प्रश्नावर मोदी म्हणाले की, २0१४ सालीही देशात मोदी लाट नाही, असे काही लोक बोलत होते. आजही तेच लोक तीच भाषा करीत आहेत. ही मंडळी ज्यांच्यासाठी काम करतात, त्यांच्यापुढे असे चित्र उभे करणे, हे त्यांचे कामच असते. पण लक्षात ठेवा, लाट ही व्यक्तीची नव्हे, तर लोकांच्या आशा-आकांक्षांचीच असते. त्या जो कोणी पूर्ण करू शकेल, तिच्याकडेच लोक वळतात. मला खात्री आहे की, आजही जनतेला माझ्याविषयी खात्री आणि विश्वास आहे. त्यामुळेच देशातील जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे.मोदी सरकारने मध्यमवर्गाला कोणताचा दिलासा दिला नाही, अशी टीका होत असल्याविषयी विचारता पंतप्रधान म्हणाले की, मध्यमवर्ग कधीच कोणाच्या उपकारांवर जगत नाही. पण देशाच्या प्रगतीत या वर्गाचे मोठे योगदान आहे. त्या वर्गासाठी आम्ही मेडिकल कॉलेजमधील सीट्स वाढवल्या, मुद्रा योजनेचा फायदा या वर्गाला झाला, त्यांना घरे विकत घेता यावीत, यासाठी ६ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज आम्ही माफ केले. उज्ज्वला योजना, एलईडी बल्ब अशा साºया योजना त्यांच्यासाठीच होत्या. या वर्गाला आम्ही कधीही विसरणार नाही. त्यामुळे आम्ही प्राप्तिकरात सूट दिली. जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी झाले. त्याचा फायदा याच वर्गाला सर्वाधिक झाला.
मोदी सरकारने सीबीआय आणि न्यायव्यवस्था कमकुवत केल्याची टीका विरोधक करत असल्याबद्दल मोदी यांनी प्रत्त्युत्तर दिले. ते म्हणाले, आमच्या सरकारसाठी सीबीआय आणि न्यायसंस्था सर्वोच्च स्थानी आहे.विदेश दौऱ्याबाबत मोदी म्हणाले की, सर्वच प्रथम विदेशा दौरा करतात. अनेक बहुस्तरीय फोरम्स आणि शिखर परिषदा असतात. पंतप्रधानापेक्षा कमी दर्जाच्या व्यक्तींचे या ठिकाणी ऐकले जात नाही; म्हणून अशा दौºयासाठी जाणे जरुरी असते. मनमोहनसिंग यांनीही हेच केले. असे करणे जरुरी आहे. मी जगभरात भारताचा आवाज बुलंद केला.मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा मिळूनच भाजपा चालवतात, या आरोपाचा त्यांनी ठामपणे इन्कार केला. ते म्हणाले की हा पक्ष कार्यकर्त्यांमुळेच उभा आहे. भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. पोलिंग बूथवर काम करणारी कार्यकर्ते मंडळीच हा पक्ष चालवतात. आम्ही केवळ त्यांचे नेते आहोत. त्यामुळे ज्याला लोक मोदी लाट म्हणतात, ती पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांनी तयार केलेली भाजपाची लाट होती.