कर्नाटक, मध्य प्रदेशनंतर काँग्रेसच्या ताब्यातून आणखी एक मोठे राज्य जाण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan political crisis) शनिवारपासून मोठी उलथापालथ सुरु झाली असून उप मुख्यमंत्री सचिन पायलट हे भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. नाराज असलेल्या पायलटांना त्यांचे काही महिन्यांपूर्वीच भाजपात गेलेले मित्र ज्योतिरादित्य शिंदे यांचे पाठबळ मिळाले आहे. शिंदे यांनी पायलट यांचे उघडपणे समर्थन केले आहे. यामुळे राजस्थानमध्येही सत्तापालट अटळ असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी पूर्वाश्रमीचे मित्र सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ ट्विट करत काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. ''माझे जुने साथीदार राहिलेल्या सचिन पायलट यांना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून डावलले जात आहे. हे पाहून मी दु:खी आहे. यावरून काँग्रेसमध्ये प्रतिभावान आणि ताकदवान नेत्यांना जागा नसल्याचे स्पष्ट होत आहे., असे ट्विट केले आहे. महत्वाचे म्हणजे ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस, सचिन पायलट आणि गेहलोत यांना टॅग केले आहे.
यानंतर शिंदे यांनी काँग्रेसला सोडून भाजपात सहभागी झालेले मध्य प्रदेशचे आमदार प्रद्युम्न सिंह लोधी यांचे स्वागत केले आहे. लोधी यांनी रविवारी भोपाळमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. काही महिन्यांपूर्वीच शिंदे यांनी काँग्रेसला बायबाय करत भाजपात प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी 22 आमदारांना राजीनामे द्यायला लावून कमलनाथ सरकार पाडले होते. 20 मार्चला कमलनाथ यांना राजीनामा द्यावा लागला होता. तिथेही शिंदे यांना कमलनाथ बाजुला करत असल्याचा आरोप होता. तर पायलट यांचाही तोच आरोप आहे.
शिंदे-पायलट मैत्री सर्वश्रूतमध्य़ प्रदेश आणि राजस्थानमध्ये निव़डणुकीवेळी काँग्रेसने तरुण चेहऱ्यांचा डाव खेळला होता. शिंदे यांना तिथे ना मुख्यमंत्री पद मिळाले नाही प्रदेशाध्यक्ष पद. तर राजस्थानमध्ये पायलटना उपमुख्यमंत्री बनविण्यात आले. यामुळे नाराज असलेल्या शिंदे यांनी भाजपमध्ये जात राजकीय धुरिणांनाही धक्का दिला होता. दुसरीकडे सरकार पाडले होते. तेव्हापासून पायलट देखील ट्रेंड करू लागले होते. जर गेहलोत सरकारवर काही संकट आले तर त्य़ामध्ये शिंदे यांचा हात असल्याचे नाकारता येणार नाही, असे राजकीय धुरिणांनी सांगितले.
थोड्याच वेळात गेहलोत, आमदारांची बैठक
राज्यसभा निवडणुकीनंतर सुरक्षित दिसणारे राजस्थान सरकरा पुन्हा एकदा संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपावर सरकार पाडण्याचा आरोप केला आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सचिन पाय़लट दिल्लीत असून त्यांच्याकडे 24 ते 25 आमदार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर गेहलोत यांनी रात्री मंत्री आणि आमदारांची तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात याकडे लक्ष लागले आहे. तर रणदीप सुरजेवाला आणि अजय माकन यांना काँग्रेसने जयपूरला पाठविले आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला ते हजर राहणार आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
हार्दिक पटेलांनी गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष होताच उत्साहात ट्विट केले; ट्रोल झाले
गेहलोत सरकारची रात्री लिटमस टेस्ट; तातडीची बैठक, दोन डझन आमदार पायलटांकडे
कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे
Rajasthan political crisis: आमदारांनो! लवकर जयपूर गाठा, ज्याचा फोन बंद येईल...; गेहलोतांचे आदेश
मान गए Apple! तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार; प्रकल्पच भारतात हलवणार
हद्द झाली! अनुकंपाखाली नोकरी दिली नाही; लॉकडाऊनमध्ये तरुणाने SBI ची हुबेहूब शाखाच उघडली
मोठा दिलासा! पुन्हा पुन्हा वापरता येणार N95 मास्क; केवळ 90 मिनिटांत 'चक्र डिकोव्ह' करणार निर्जंतुक