नवी दिल्ली: कोणताच धर्माचा गाभा हा अमानवी नसतो. प्रत्येक पंथ, संप्रदाय आणि परंपरा कायमच मानवी मूल्य वृद्धिंगत करण्याचे कार्य करतात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते गुरुवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ' इस्लामिक हेरिटेज: प्रमोटिंग अंडरस्टँडिंग अॅण्ड मॉडरेशन' परिषदेच्या व्यासपीठावर बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, भारतीय लोकशाही ही देशातील विविधतेचा उत्सव आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन चालायचा आमचा प्रयत्न आहे. शहरांच्या प्रगतीवरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे. देशाची भरभराट झाली तरच नागरिकांच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदेल, असे मोदींनी सांगितले. याशिवाय, पंतप्रधानांनी मुस्लिम तरूणांना मानवतेचा पुरस्कार करणाऱ्या इस्लामच्या अनुकरणाबरोबरच आधुनिक विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले. कोणत्याही धर्माचा गाभा हा अमानवी नसतो. प्रत्येक पंथ, संप्रदाय आणि परंपरा कायमच मानवी मूल्य वृद्धिंगत करण्याचे कार्य करते. त्यामुळे मुस्लिम तरुणांनी मानवतेची शिकवण देणाऱ्या इस्लामचा अंगिकार करताना दुसरकीडे विज्ञान व विकासाच्या साधनांचाही उपयोग करावा, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला.
कोणताही धर्म अमानवी कृत्यांचे समर्थन करत नाही- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2018 2:08 PM